आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Entertainment
  • Tv
  • Vishal Sonkar Quit The Delivery Boy Job And Reached 'Dance Divane', Said After Winning 'Now I Will Build My Own House'

​​​​​​​डिलीव्हरी बॉयची नोकरी सोडून 'डान्स दीवाने' मध्ये पोहोचला होता विशाल, जिंकल्यावर म्हणाला - 'आता स्वतःचे घर बनवेल...' 

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

टीव्ही डेस्क : जमशेदपुरच्या विशाल सोनकरने डान्सिंग रिअॅलिटी शो 'डान्स दीवाने' चे दुसरे सीजन जिंकले आहे. शनिवारी झालेल्या ग्रँड फिनालेमध्ये त्याला शोचा विजेता घोषित केले गेले. बक्षीस म्हणून त्याला 15 लाख रुपयांची धनराशी मिळाली आहे. 23 वर्षांचा विशाल आधी फूड डिलीव्हरी बॉय होता. पण शोमध्ये भाग घेण्यासाठी त्याने ती नोकरी सोडली होती. दैनिक भास्करसोबत बातचीतमध्ये विशालने  प्रवासाबद्दल आणि भविष्यातील योजनांबद्दल बोलला. 


विशाल सोनकरसोबत झालेल्या बातचितीतील काही अंश... 
'विश्वास बसत नाहीये की, मी हा शो जिं
कलो'
मला टेक्निकल डान्स येत नव्हता, पण या शोद्वारे मी तेही शिकलो. विश्वास बसत नाही की, मी 'डान्स दीवाने' ची ट्रॉफी जिंकली आहे. यासाठी मी खूप मेहनत केली होती, जी फळाला आली. मी फूड डिलीव्हरी बॉय होतो, त्यामुळे डान्स प्रॅक्टिस करण्याची संधी मिळत नव्हती. जेव्हा कळाले की, या शोचे ऑडिशन सुरु आहेत तर मीदेखील माझे नशीब अजमावेन. मी मुंबई राउंडसाठी निवडले गेलो, जे मी क्लियर केले आणि शोमध्ये पोहोचलो.  

'शशांक सरांनी खूप मदत केली...'
तिन्ही जजेसने मला खूप प्रोत्साहित केले. पण शशांक (खेतान) सरांनी मला आर्थिक दृष्टीनेही खूप सपोर्ट केले. माझ्या आईला आर्थराइटिस होता आणि आमच्याकडे त्यांच्या उपचारासाठी पैसे नव्हते. तेव्हा शशांक सरांनी आम्हाला खूप मदत केली. ज्यामुळे आता आई एकदम ठीक आहे. माधुरी दीक्षितनेदेखील मला खूप प्रोत्साहित केले. ती माझ्या परफॉर्मन्सवर शिटी वाजवायची तर मला खूप कॉन्फिडन्ट वाटायचे.  

'सर्वात आधी घर बनवू इच्छितो...'
मी 15 लाख रूपये जिंकले आहेत, ज्यामधून सर्वात आधी स्वतःचे घर बनवू इच्छितो. आता मी भाड्याच्या घरात राहातो. याव्यतिरिक्त मी जिथे राहातो,  टॅलेंटेड लोक आहेत. पण त्यांना योग्य प्लॅटफॉर्म मिळत नाही. अशात गरजवंतांसाठी मी एक अकॅडमी बनवू इच्छितो.  

'संधी मिळाली तर पुन्हा शिक्षण सुरु करेन...'
घरातील जबाबदाऱ्यांमुळे मी माझे शिक्षण पूर्ण करू शकलो नाही. माझे वडील आता हयात नाहीत. त्यांचा अपघात झाला होता. त्यानंतर कुटुंबाला सपोर्ट करण्यासाठी मला शिक्षण सोडावे लागले. मला माझ्या बहिणीला खूप शिकवायचे आहे. तिचे प्रत्येक स्वप्न करायचे आहे. संधी मिळाली तर मीही पुन्हा स्वतःचे शिक्षण पूर्ण करेन. 

रणवीर, श्रद्धाला कोरियोग्राफ करण्याचे आहे स्वप्न... 
आता मी कोरियोग्राफर बानू इच्छितो, टीव्हीवर अनेक डान्सिंग रिअॅलिटी शो येणार आहेत. प्रयत्न करेन की, त्यांपैकी एखाद्या शोमध्ये कोरियोग्राफर बानू शकेन आणि आपले करिअर याच दिशेने मी पुढे चालेन. माझे स्वप्न रणवीर सिंह आणि श्रद्धा कपूर यांना कोरियोग्राफ करण्याचे आहे. आशा आहे की, एक दिवस ते पूर्ण होईल.  

'मला जमशेदपुर सोडायचे नव्हते...'
मला जमशेदपुर कधीच सोडायचे नव्हते. तिथे राहूनच माझ्या जोडल्या गेलेल्या प्रत्येक व्यक्तीचे स्वप्न पूर्ण करण्याचा प्रयत्न करेन. सोबतच जमशेदपुरच्या इतर लोकांसाठीही काहीतरी करू इच्छितो. 

बातम्या आणखी आहेत...