Home | Maharashtra | Vidarva | Nagpur | Vishnu Manohar cook 1 and half ton organic vegetable

विष्णू मनोहरांनी बनवली दीड टनाची सेंद्रिय भाजी; आणखी एका विक्रमाच्या उंबरठ्यावर 

प्रतिनिधी | Update - Feb 11, 2019, 08:10 AM IST

विष्णू मनोहर यांनी तयार केलेली सेंद्रिय भाजी घेण्यासाठी खवय्यांनी गर्दी केली होती. 

  • Vishnu Manohar cook 1 and half ton organic vegetable

    नागपूर- खिचडी आणि जळगावी वांग्याच्या भरितानंतर प्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर यांनी रविवारी दीड हजार किलो सेंद्रिय भाजी तयार केली. या मिश्र भाजीचे नंतर खवय्यांना नि:शुल्क वितरण करण्यात आले. विष्णूजी की रसोई येथे सकाळी ७ ते ११ या वेळेत ही भाजी तयार करण्यात आली. लोकांना सेंद्रिय भाज्यांचे महत्त्व कळावे म्हणून हा उपक्रम केल्याचे मनोहर यांनी सांगितले.

    विशेष म्हणजे, ही भाजी शेणाच्या गोवऱ्यांवर करण्यात आली. यासाठी पालक ५० किलो, मेथी २५ किलो, गाजर २२०, बटाटे १७५, कांदे १००, हिरवे लसूण व आले प्रत्येकी ५० किलो, वांगी १०० किलो, मिरची ५०, सांबार १००, फुलकोबी २००, कढीपत्ता १०, शेवगा ५०, टाेमॅटो १५०, चणे ५० किलो इतक्या भाज्या लागल्या. या उपक्रमात व्यंकट वट्टी, पल्लवी पंडित, नरेंद्र येलणे, प्राजक्ता चौधरी, शशिकांत मानापुरे, प्रशांत दीक्षित आदींचा सहभाग होता.

Trending