Home | Jeevan Mantra | Dharm | vishnu puran tips for marriage

पुराणामध्ये वर्णित आहे, कोणत्या 4 प्रकारच्या मुलींशी चुकूनही करू नये लग्न

रिलिजन डेस्क | Update - Feb 14, 2019, 12:04 AM IST

विष्णू पुराणामध्ये स्त्रियांशी संबंधित विविध गोष्टी सांगण्यात आल्या आहेत. या पुराणामध्ये कोणत्या 4 प्रकारच्या मुलींची लग

 • vishnu puran tips for marriage

  मनुष्य जीवनातील सोळा संस्कारामधील एक महत्त्वपूर्ण संस्कार लग्न आहे. सुखी वैवाहिक जीवनासाठी चांगला जोडीदार मिळणे आवश्यक आहे. लग्नासाठी अशा मुलीची निवड करावी, जी पतीची आणि कुटुंबाची प्रेमपूर्वक काळजी घेणारी असेल. विष्णू पुराणामध्ये स्त्रियांशी संबंधित विविध गोष्टी सांगण्यात आल्या आहेत. या पुराणामध्ये कोणत्या 4 प्रकारच्या मुलींची लग्न करू नये याविषयी सांगितले आहे. येथे जाणून घ्या, या 4 मुली कोण आहेत...


  आई किंवा वडिलांच्या नात्यातील
  कोणत्याही व्यक्तीने आई किंवा वडिलांच्या नात्यातील मुलीशी लासन करू नये. शास्त्रामध्ये नात्यामध्ये किंवा एकाच गोत्रात लग्न करणे वर्ज्य सांगण्यात आले आहेत. यामुळे जेनेटिक आजार होण्याची शक्यता राहते. ज्या मुलीचे आईच्या नात्यातील पाच पिढीपर्यंत आणि वडिलांच्या नात्यातील सात पिढीपर्यंत नाते जुळलेले असेल अशा मुलीशी लग्न करू नये.


  दुष्ट पुरुषांशी संबंध ठेवणारी
  स्त्रीने दुष्ट पुरुषांशी जवळीकता वाढवू नये. असे केल्यास ती केव्हाही एखाद्या संकटात सापडू शकते. दुष्ट पुरुष त्या स्त्रीचा स्वतःच्या स्वार्थासाठी उपयोग करू शकतो. अशा पुरुषाच्या संगतीमध्ये राहिल्याने स्त्रीचा स्वभावही तसाच होतो. यामुळे तिच्या चारित्र्याला दोष लागू शकतो. यामुळे अशा मुलीसोबत लग्न करू नये.


  वाईट बोलणारी
  असे म्हणतात की, वाणीमध्ये देवी सरस्वतीचा निवास असतो. जी मुलगी मधुर वाणी बोलणारी असते, तिच्यावर देवी सरस्वती सदैव प्रसन्न राहते. वाईट किंवा कटू शब्द बोलणाऱ्या मुलीचा स्वभाव तिच्या भाषेप्रमाणेच वाईट असतो. अशा मुलीमुळे घरात कलह निर्माण होतो. यामुळे अशा मुलीसोबत लग्न करू नये.


  उशिरापर्यंत झोपणारी
  उशिरापर्यंत झोपणारी स्त्री कुटुंबाची जबाबदारी पूर्ण करू शकत नाही. उशिरापर्यंत झोपणे आळसाचे मुख्य कारण आहे. आळशी स्त्री घरात स्वच्छता ठेऊ शकत नाही. घरामध्ये लक्ष्मीची कृपा कायम ठेवण्यासाठी साफ-सफाई करणे आवश्यक आहे. घरामध्ये धूळ, कचरा असल्यास गरिबी वाढते. तसेच सकाळी उशिरापर्यंत झोपल्याने आजार बळावण्याची शक्यता वाढते. यामुळे अशा स्त्रीशी लग्न करू नये.

Trending