आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गणपती बाप्‍पा पाहिजे त्‍याला अपत्य देतो, मीही अंधश्रद्धाळू; विशेष पोलिस महानिरिक्षक विश्‍वास नांगरे पाटलांचे वक्‍तव्‍य

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सातारा- 'ज्या गणपती बाप्पाच्या नावाने प्रत्येक कार्याची सुरुवात होते. जो विद्यार्थ्यांला विद्या देतो, धन पाहिजे त्याला धन देतो. अपत्य पाहिजे त्याला अपत्य देतो. मोक्ष पाहिजे त्याला मोक्ष देतो. पण पोलिसांना मात्र का टेन्शन देतो, हेच कळत नाही', असे वक्‍तव्‍य कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरिक्षक विश्‍वास नांगरे पाटील यांनी केले आहे. गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांच्या बैठकीत ते बोलत होते. 


यावेळी गणेश मंडळांच्‍या कार्यकर्त्‍यांना, 'पोलिसांचे टेन्‍शन दुर करण्‍याची जबाबदारी तुमची आहे. डीजेचा आवाज कमी ठेवा. मंजूळ गिते लावा. भावगिते-भक्तीगिते लावा.', असे आवाहन त्‍यांनी केले.


साता-याचे खासदार उद्यनराजे भोसले यांनी गणती विसर्जन मिरवणुकीत डीजे वाचवणारच अशी भुमिका घेतली आहे. त्‍याच अनुषंगाने नांगरे-पाटील यांनी ही बैठक घेतल्‍याचे बोलले जात आहे. 


नेमके काय म्‍हणाले विश्‍वास नांगरे-पाटील?
- 'गणपती बाप्पा प्रसन्न होतो. मी स्वतः सिद्धीविनायक मंदीरातूनच प्रिलिमरी, मेन, इंटरव्हू आणि कुठल्या राज्यात पोस्टींग होणार, यासंबंधीचे फोन केलेत इतका मी गणपती बाप्पाचा भक्त आहे. गणपती बाप्पा प्रसन्न होतो, याची मला खात्री आहे.'
- 'आमच्याही घरी पाच दिवस गणपती होते. पण बऱ्याचवेळा मला आरतीलाही उपस्थित राहता येत नव्हते. ही परिस्थिती पोलिसांची असते. पोलिसांना 12-14-18 तास उभे राहावे लागते. त्यातून अनेकदा संघर्षाची परिस्थिती निर्माण होते. त्यांना कायद्याची दंडुक्‍याची भाषाही दाखवावी लागते. तरी पण का नागरीक शास्त्र शिकवावे लागते. नियम, न्यायालयाचे निर्देश हे आपल्या भल्यासाठी आहेत. नियमाचे बंधन घालून संवादातून आम्ही आणखी प्रयत्न करणार आहोत.'

बातम्या आणखी आहेत...