आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

गावात क्रिकेट खेळताना चेंडू डाेळ्यावर लागल्याने गमवली दृष्टी; आता दृष्टिहीनांची राष्ट्रीय स्पर्धा गाजवताेय, पाॅवरलिफ्टिंगमध्ये दबदबा

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गतवर्षी पाणी फाउंडेशनच्या कार्यक्रमात अभिनेता आमिर (पट्टी बांधून) साेबत खेळला. त्यानेही यष्टिरक्षक फलंदाज रावसाहेबचे काैतुक केले - Divya Marathi
गतवर्षी पाणी फाउंडेशनच्या कार्यक्रमात अभिनेता आमिर (पट्टी बांधून) साेबत खेळला. त्यानेही यष्टिरक्षक फलंदाज रावसाहेबचे काैतुक केले

एकनाथ पाठक 

औरंगाबाद  

चांद ताराें के जाे खुद हाे माेहताज,
भीख ना मांगाे उजालाें की बुंद की, 
आखाेंसे एेसे काम कराे की,
आखे खुल जांए आखवालाे की......

या दिवंगत प्रख्यात कवी आणि संगीतकार रवींद्र जैन यांच्या प्रेरणादायी ठरलेल्या चार आेळींनी अनेक दृष्टीहिनांनी आपले विश्वच चमकवून टाकले.  या खेळाडूंनी आपल्या कर्तृत्वाच्या बळावर दाही दिशा उजळून टाकल्या आहेत. परभणी  जिल्ह्यातील साबा गावच्या दृष्टीहिन रावसाहेब धरणेने क्रिकेटच्या  विश्वात वेगळी आेळख निर्माण केली. अपघाताने आलेल्या अंधत्वावर मात करत  ताे राष्ट्रीय स्पर्धा गाजवत आहे. डाेळ्याला चेंडू लागल्याने त्याला अंधत्व आले.

दृष्टीहिन भारतची यशस्वी फुटबाॅलमध्ये किक; कबड्डीत बाेनस कामगिरी :  
जन्मताच मिळालेल्या दृष्टीहिनतेवर मात करत मुंबईच्या भरत काकडेने फुटबाॅलच्या विश्वात यशस्वीपणे किक मारली आहे. त्याने आतापर्यंत तीन वेळा दृष्टीहिनाच्या राष्ट्रीय फुटबाॅल स्पर्धेत महाराष्ट्राचे प्रतिनिधीत्व केले. त्याला २०१७ मध्ये पहिल्याच स्पर्धेत स्ट्रायकरची भूमिका यशस्वीपणे पार पाडता आली. फुटबाॅलशिवाय त्याची कबड्डी खेळ प्रकारामधील कामगिरी बाेनससारखी  ठरली. त्याने राष्ट्रीय  स्पर्धेतही  चुणूक दाखवली आहे.
 

तीन वेळा राष्ट्रीय स्पर्धेत 
क्रिकेटची आवड जपतानाच रावसाहेबने आपला छंद मर्यादित ठेवला नाही. त्याने क्रिकेटपाठाेपाठच पाॅवरलिफ्टिंगमध्ये खेळ प्रकारातही विशेष  प्रावीण्य संपादन केले आहे. त्यामुळेच त्याचा या खेळ प्रकाराच्या राष्ट्रीय स्पर्धेतही चांगलाच दबदबा राहिलेला आहे. त्याने क्रिकेटनंतरच्या फावल्या वेळात पाॅवरलिफ्टिंगसाठीचे तंत्रशुद्ध असे प्रशिक्षण घेतले आहे. याच्या बळावर त्याला या खेळ प्रकारातील स्पर्धांमध्ये पदकांची कमाई करता आली आहे.
 
 

बातम्या आणखी आहेत...