आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सर्जिकल स्ट्राइकचा नवा व्हिडिओ आला समोर, लष्‍कराने POKमध्ये जाऊन केला होता हल्ला

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- 29 सप्टेंबरला सर्जिकल स्ट्राइकची सेकंड अॅनिव्हर्सरी आहे. यापार्श्वभूमीवर संरक्षण मंत्रालयाने सर्जिकल स्ट्राइकचा एक नवा व्हिडिओ प्रसिद्ध केला आहे. यामध्ये भारतीय लष्कराने दहशतवाद्यांचे तळ कशाप्रकारे उद्‍धवस्त केले हे दिसत आहे. लष्कराने दहशतवाद्यांवर केले बॉम्बहल्ले करण्यात आले होते. दरम्यापन, यापूर्वी 27 जून 2018 रोजी लष्कराने सर्जिकल स्ट्राइकचे काही व्हिडिओ जारी केले होते.


लष्कराने असे केले सर्जिकल स्ट्राइक..
'सर्जिकल स्ट्राइक' करण्यामागचे कारण म्हणजे, 18 सप्टेंबर 2016 रोजी उरी येथे झालेला हल्ला होय. 18 सप्टेंबर 2016 ला उरी येथे लष्कराच्या शिबिरावर दहशतवादी हल्ला झाला होता. यामध्ये 21 जवान शहीद झाले होते. हल्ल्याच्या 11 दिवसांनी 29 सप्टेंबर 2016 रोजी भारतीय लष्‍कराने एलओसी ओलांडून पाकच्या भूमीत तीन किलोमीटर आत जाऊन दहशतवाद्यांवर हल्ले केले होते. सर्जिकल स्ट्राइकमध्ये लष्कराने रॉकेट लॉन्चर, मिसाइल आणि छोट्या शस्त्रांचा वापर करण्यात आला होता.

बातम्या आणखी आहेत...