आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

\'स्टॅच्यु ऑफ युनिटी\'नंतर आता भारत बनवत आहे जगातील सगळ्यात उंच पुल, 2019 मध्ये होईल तयार....

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नॅशनल डेस्क- जगातीन सर्वात उंच प्रतिमा 'स्टॅच्यू ऑफ युनिटी' बनवल्यानंतर भारत आता जगातिल सर्वात उंच पुल बनवत आहे. हा पुल जम्मु-कश्मीरच्या चेनाब नदीवर बांधला जात आहे. या पुलाला बनवण्याची योजना अनेक दिवसांपासून सुरू होती, पण आता या पुलाने आकार घेण्यास  सुरूवात  केली आहे. हा पुल याच्या डिझाइनमुळे आणि आकारामुळे चर्चेत आला आहे. हा पुल दिल्लीच्या कुतूबमिनार पेक्षा 5 पटिने  आणि पॅरिसच्या आयफेल टॅावरपेक्षाही उंच  असेल.

 

आयफेल टॅावरपेक्षा उंच आणि 1.3 किलोमीटर लांब 
जम्मूच्या रिआसी जिल्ह्यातीन चेनाब नदीवर हा पुल बांधण्यात येणार आहे. हा आयफेल टॅावरपेक्षा 35 मीटर उंच असेल. याची एकुण लांबी 1.3 किलोमीटर असेल. हा पुल बांधल्यानंतर या परिसरातील प्रगतीची वाट मोकळी होणार आहे. हा पुल कटरा आणि बनिहालच्या मधला 111 किलोमीटरच्या रस्त्याला जोडणार आहे. हा पुल उधमपुर-श्रीनगर-बारामुला रेल्वे लिंक प्रक्लापा अंतर्गत बांधण्यात येत आहे. या दुर्गम बांधण्यात येणाऱ्या या पुलासाठी  अंदाजे 1100 कोटी रूपये इतका खर्च येणार आहे. या पुलाच्या बांधकामात 24000 टन पोलादाचा वापर करण्यात येणार आहे, त्यामुळे हा पुल 260 किलोमीटर प्रति तास वेगाने वाहणाऱ्या वाऱ्याचा दाब सहन करू शकतो. हा पुल बेइपॅन नदीवर बनलेल्या चीनच्या शुईबाई रेल्वे पुलाचा रेकॅार्ड(275 मीटर) मोडेल. 

 

अटल सरकारमध्ये सुरू झाला होता प्रोजेक्ट 

- या पुलाचे निर्माण कार्य माझी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या कार्य काळात 2002 मध्ये सुरू झाले होते. 

 

- 2008 मध्ये याला अनसेफ करार देऊन याचे कार्य थांबवले होते. 

 

- 2010 मध्ये याचे काम पुन्हा सुरू करण्यात आले होते. हा पुल आता एक नॅशनल प्रोजेक्ट घोषित झाला आहे. 

 

- मोदी सरकार आल्यानंतर या प्रोजेक्टला खास मान्यता प्राप्त झाली आहे. या प्रोजेक्टचे काम 2019 पर्यंत संपवण्याचे आध्यादेश केंद्र सरकारने दिले आहेत

 

निर्माण कार्यत आल्या अनेक अडचणी 
 - दक्षिण रेल्वेला इतक्या उंचीवर पुल बांधण्यात अनेक अडचणी आल्या.

 

- रेल्वेच्या आधिकाऱ्यांनी सांगितले की, या ठिकाणची सगळ्यात मोठी समस्या येथील वातावरण होते.

 

- हिमालयन रेंज असल्यामुळे येथील वातावरण कधीही बदलायचे. 

 

बातम्या आणखी आहेत...