Home | Jeevan Mantra | Arogya/Ayurved | vitamins and minerals for man health

Healthy Body : पुरुषांसाठी आवश्यक आहेत हे 7 व्हिटॅमिन्स, मिनरल्स

हेल्थ डेस्क | Update - Sep 02, 2018, 03:05 PM IST

पुरुषांच्या पोषक द्रव्यांच्या गरजा महिलांपेक्षा वेगळ्या असतात. फूड अंॅड न्यूट्रिशन एक्स्पर्ट अमिता सिंह सांगतात की, एका

 • vitamins and minerals for man health

  पुरुषांच्या पोषक द्रव्यांच्या गरजा महिलांपेक्षा वेगळ्या असतात. फूड अंॅड न्यूट्रिशन एक्स्पर्ट अमिता सिंह सांगतात की, एका ठराविक वयानंतर पुरुषांच्या शरीरामध्ये व्हिटॅमिन्स आणि मिनरल्स कमी होतात. निरोगी राहण्यासाठी याची खूप गरज असते. यांची कमतरता काही पदार्थांनी पूर्ण करता येऊ शकते. अमिता सिंह पुरुषांसाठी गरजेच्या असणेऱ्या 7 व्हिटॅमिन्सविषयी सांगत आहेत. या व्हिटॅमिन्सची गरज कशी पूर्ण करावी याविषयी माहितीसुद्धा त्या देत आहेत.


  व्हिटॅमिन ए
  डोळ्यांना निरोगी ठेवते. दृष्टी लवकर कमजोर होत नाही. हाडे मजबूत राहतात आणि आजारांपासून बचाव करण्यास मदत होते.
  गरज किती? : 700-900 मायक्रोग्रॅम (2300-3000 आयु) नियमित
  कसे मिळते? : दूध, दुग्धजन्य पदार्थ, रताळी, ब्रोकली.


  व्हिटॅमिन के
  हे ब्लड क्लॉटिंगमध्ये मदत करून अंतर्गत आणि बाहेरील ब्लडिंग होऊ देत नाही. हाडांमध्ये कॅल्शियम शोषून घेण्यास मदत करते.
  गरज किती? : 122-138 मायक्रोग्रॅम नियमित
  कसे मिळते? : पालक, ब्रोकली अशा हिरव्या भाज्या. सोयाबीन तेल.


  व्हिटॅमिन बी36
  यामुळे प्रतिकार क्षमता चांगली राहते. आजारांपासून बचाव होतो. लाल रक्त पेशींची संख्या वाढवण्यास मदत होते. नर्व्हसचे फंक्शन चांगले ठेवते.
  किती गरजेचे? : 1.3 मिलिग्रॅम नियमित
  कसे मिळते? : बीन्स, नट्स, अंडी, मासे, होल ग्रेन, मांस, बटाटे.


  व्हिटॅमिन बी१२
  रक्त आणि मेंदूचे कार्य सामान्य ठेवण्यासाठी गरजेचे आहे. यामुळे पचनक्रिया सुधारते.
  किती गरजेचे? : दररोज जवळपास 204 मिलिग्रॅम
  कसे मिळते? : मांस, चिकन, दूध, दही, पनीर, अंडी.


  व्हिटॅमिन डी
  वाढत्या वयाचा प्रभाव कमी करते. मेंदू आणि हृदयविकारांपासून आजारांपासून बचाव करते. शरीरात कॅल्शियम शोषून घेण्यासाठी आवश्यक.
  किती गरजेचे? : 600 आयु नियमित
  कसे मिळते? : हे मिळवण्यासाठी सूर्य किरणे उत्तम स्रोत आहे. मासे आणि दुग्धजन्य पदार्थांतूनही मिळते.

 • vitamins and minerals for man health

  मॅग्नेशियम 
  हे घेतल्यास उच्च रक्तदाबाची समस्या दूर होऊ शकते. हृदयविकार, मधुमेहाचा धोका कमी करते. कॅल्शियम शोषून घेण्यास मदत. 
  गरज किती? : 320 मिलिग्रॅम नियमित 
  कसे मिळते? : हिरव्या पालेभाज्या, नट्स, बीन्स, सोयाबीन. 

 • vitamins and minerals for man health

  कॅल्शियम 
  पुरुषांची हाडे, स्नायू, नर्व्हस आणि हृदयाचे कार्य सामान्य ठेवण्यासाठी कॅल्शियम गरजेचे असते. 
  गरज किती? : जवळपास 1000 मिलिग्रॅम नियमित 
  कसे मिळते? : दूध, दुग्धजन्य पदार्थ, बदाम, सोयाबीन, संत्री, मासे. 

Trending