आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'जुडवा 2' नंतर 'कुली नंबर-1'च्या रिमेकमध्येही विवान साकारणार खलनायकाची भूमिका

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


बॉलिडून डेस्क- वरुण धवनच्या आगामी 'कुली नंबर-1'च्या रिमेकमध्ये अभिनेता विवान भटेना खलनायकाच्या रूपात दिसणार आहे. त्याने यापूर्वी वरुणसोबत जुडवा-2 मध्येही काम केले आहे. त्यातही तो खलनायकाच्या भूमिकेत होता. विवान सांगतो, ''हो, मी 'कुली नंबर-1'मध्ये पुन्हा एकदा विलनची भूमिका साकारणार आहे. याच्या शूटिंगसाठी मी लवकरच बँकॉकला जातोय."


ज्या प्रकारे पहिला चित्रपट गोविंदावर फोकस होता त्याचप्रमाणे हा चित्रपट वरुणवर फोक्सड राहणार आहे. विवाने नुकतेच अक्षय कुमारसोबत सूर्यवंशी चित्रपटाचे शूटिंग पूर्ण केले आहे. याविषयी त्याने सांगितले, "माझी सुरुवातीपासूनच मोठ्या चित्रपटात काम करण्याची इच्छा होती. ती सूर्यवंशीमुळे पूर्ण झाली. या चित्रपटात बाइक स्पर्धेचे अनेक दृश्य आहेत. मला यात काम मिळाले म्हणून मी स्वत:ला भाग्यवान समजतो."

अक्षयविषयी विवान म्हणाला, "अक्षय सरांनी मला खूप मार्गदर्शन केले. प्रत्येक दृश्यात आमची चांगली बॉडिंग आहे. ते सेटवर अनेकदा थट्टा मस्करी करत असतात, कारण वातावरण चांगले राहत. हसत खेळत काम करणे त्यांना आवडते." 
 

पुढील स्लाइडवर पाहा...

बातम्या आणखी आहेत...