आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जेव्हा सलमान खानची आई अॅडमिट झाली होती विवेक ओबेरॉय गुपचुप पोहोचला होता हॉस्पिटलमध्ये, पण हेलनने पाहताच केला होता सलीम आणि सलमानला फोन

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई : सलमान खान आणि संजय दत्तवर चित्रीत करण्यत्व आलेले गाणे 'सुनो गौर से दुनिया वालो' अपकमिंग फिल्म 'पीएम नरेंद्र मोदी' मध्ये सामील करण्यात आलेले आहे. पण रिपोर्ट्सनुसार, सलमान मेकर्समुळे नाराज आहे. कारण या फिल्ममध्ये लीड रोल विवेक ओबेरॉय करत आहे. ज्याच्याशी सलमानचे जुने भांडण आहे. 2003 मध्ये हे भांडण ऐश्वर्या रायमुले झाले होते आणि त्यानंतर हे दोन्ही स्टार्स कधीही एकमेकांसमोर आले नाहीत. पण तुम्हाला माहित आहे का की, या फाइटनंतर विवेक एकदा सलमानच्या घरी आला होता.  

सलीम खान यांनी बोलावल्यानंतर विवेक आणि त्याचे पिता आले होते घरी...
2006 मध्ये सलमान खान यांची आई सलमा यांना लीलावती हॉस्पिटल मध्ये दाखल केले गेले होते. खान परिवारातील कोणत्याही सदस्यने विवेकला याबद्दल माहिती दिली नव्हती. तरीही तो दवाखान्यात आला आणि सलमा यांच्या तब्बेतीची विचारपूस केली. त्यावेळी हॉस्पिटलमध्ये सलमानची दुसरी आई हेलन होत्या. त्यांनो विवेक दवाखान्यात आल्याची माहिती सलीम खान यांना दिली. सलीम यामुळे खूप सरप्राइज्ड होते की, विवेक सलमा यांना पाहण्यासाठी आला. त्यांनी लगेच विवेकचे पिता सुरेश ओबेरॉय यांना कॉल केला आणि म्हणाले, "जर तुम्ही दवाखान्यापर्यंत आले तर घरीही या प्लीज." सांगितले जाते की, जेव्हा विवेक हॉस्पिटलमधून निघाला तेव्हा सलमा यांनी त्याला आलिंगन देखील दिले होते. 

सलमानच्या घरी आलेला विवेक पडला सलीम यांच्या पाया...  
सलीम यांनी बोलावले म्हणून सुरेश ओबेरॉय पत्नी यशोधरा आणि मुलगा विवेक यांच्यासोबत वांद्र्यातील त्यांच्या घरी आले होते. यादरम्यान विवेक चुपचाप ड्रिंक करत राहिला आणि त्याच प्रश्नांची उत्तरे दिली जे प्रश्न विचारले गेले. सलीम यांनी सुरेश आणि यशोधरा यांच्याशी गप्पा मारल्या. विवेकच्या चांगल्या करियरमुळे आनंद व्यक्त केला. मग ओबेरॉय कपलने सलमानच्या कोर्ट केसबद्दल चिंतादेखील व्यक्त केली. जेव्हा ते तिथून निघाले तेव्हा विवेक सलमानच्या वडिलांच्या पाया पडला. हेही सांगितले जाते की, हेलनने विवेक हॉस्पिटलमध्ये आल्याची माहिती सलमानलादेखील दिली होती. 

बातम्या आणखी आहेत...