आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ऐश्वर्याच्या त्या मीम बाबत विवेक ओबेरॉयने मागितली माफी, म्हणाला - महिलांचा अपमान करण्याबाबत मी विचारही करू शकत नाही

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - सर्व स्तरातून टीकेची झोड उठल्यानंतर अभिनेता विवेक ओबेरॉयने ऐश्वर्या रायवरील शेअर केलेल्या मीम बाबत माफी मागितली आहे. त्याने लिहिले की, 'कधी-कधी एखादी गोष्ट पहिल्या नजरेत गमतीशीर वाटते, पण ती सर्वांनाच तशी वाटेल असे होत नाही. मी गेल्या 10 वर्षांत 2 हजारहून अधिक वंचित मुलींना सक्षम बनविण्याचे काम केले आहे. मी कधीच कोणत्या महिला अपमान करण्याबाबत विचार करू शकत नाही.' विवेक ट्वीट डिलीट करत लिहिले की, माझ्या ट्वीटमुळे एखाद्या महिलेला दुःख झाले असेल तर मला याचा खेद आहे. 


याअगोदर विवेकने या मीमबाबत कोणत्याही प्रकारची माफी मागण्यास नकार दिला होता. राजकीय नेता त्यांच्या या गोष्टीचे राजकारण करत असून एका विनोदावर मला तुरूंगात टाकण्याची त्यांची इच्छा असल्याचा आरोप विवेकने लावला होता. विवेकने शेअर केलेला फोटो तीन फोटो एकत्रिक करून तयार करण्यात आली होती. यामध्ये सलमान खान, ऐश्वर्या राय बच्चन, विवेक आणि आराध्या यांचे वेगवेगळे टप्पे दाखवण्यात आलेला तो फोटो होता. 


राष्ट्रवादी काँग्रेसने केली होती  विवेकच्या अटकेची मागणी 
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने विवेकच्या या ट्वीटवर टीका केली होती. पद्मश्रीने सन्मानित झालेल्या महिलेबाबत कोणी अशाप्रकारच्या भाषेचा कसा करू शकतो? राष्ट्रीय आणि राज्य महिला आयोग काय करत आहे? असा सवाल एससीपीने विचारला होता. विवेकच्या या ट्वीटबाबत राष्ट्रवादीने विवेक 
ओबेरॉय विरोधात कारवाई करण्यात येऊन त्याला अटक करण्यात यावी अशी मागणी केली होती. 


रांचीच्या एक युवकाने अपलोड केला होता फोटो
रांचीच्या पवन सिंह या तरूणाने आपल्या ट्विटर हँडलवरून तो फोटो अपलोड केला होते. मला तो फोटो क्रिएटिव्ह वाटला आणि त्यामुळे मी तो शेअर केला असल्याच विवेकने सांगितले. यामध्ये कोणतेही राजकारण नाहीये. हे खरे आयुष्य आहे. असे विवेकने सांगितले. 

बातम्या आणखी आहेत...