आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Vivek Oberoi Receives Backlash For Sharing 'exit Poll' Meme Involving Aishwarya Rai, Salman Khan, Abhishek Bachchan

एक्झिट पोलच्या बहाण्याने विवेकने उडवली ऐश्वर्या, सलमान आणि अभिषेकची खिल्ली, राष्ट्रवादीने केली अटक करण्याची मागणी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलीवूड डेस्क- नितीन गडकरींच्या हाताने आपल्या नवीन चित्रपटाचे पोस्टर रीलिज करणारा अभिनेता विवेक ओबेरॉय ट्विटरवर ट्रोल झाला आहे. ट्विटरवर त्याने एक सटायर असलेला फोटो ट्वीट केला, ज्यात सलमान खान, ऐश्वर्या राय बच्चन, तो स्वतः आणि आराध्याचे फोटोज आहेत. सलमान आणि ऐश्वर्याचा फोटो सगळ्यात वर आहे. त्याला ओपिनियन पोलम्हणून दाखवण्यात आले आहे. त्यानंतर  एक्झिट पोल म्हणून स्वतः विवेक आणि एश्वर्याचा फोटो आहे तर रिझल्ट म्हणून अभिशेक आणि एश्वर्या आणि आराध्याचा फोटो आहे.


सोशल मीडियावर हा फोटो रांचीच्या पवन सिंह नावाच्या व्यक्तीने आपल्या ट्विटर हँडलवरून शेअर केला. विवेकने त्याला रिट्वीट केले आणि सोबत लिहीले- 'काय क्रिएटिव्ह आहे. यात कोणतेही पॉलिटीक्स नाहीये. हीच लाईफ आहे.'


लोकांनी केले ट्रोल-
सोशल मीडियावर लोकांनी विवेकच्या या गोष्टीवर टीका केली आहे. अनेकजण म्हणाले विवेकने हे फक्त पब्लिसिटीसाठी केले आहे. यातून स्पष्टपणे दिसते की, त्याच्या मनात महिलांविषयी किती सन्मान आहे.

 

 


राष्ट्रवादी म्हणाली- अटक करा त्याला-
राष्ट्रवादी पक्षाने विवेकच्या यावर खूप कडक टीका केली आहे. म्हणाले, "एखादा पद्मश्रीने सन्मानित व्यक्ती कोणासाटी यास्तरावरच्या भाषेचा कसा उपयोग करू शकतो. राष्ट्रीय आणि राज्य महिला कमीशन काय करत आहे? त्याच्या विरोधात कडक कारवाई करून त्याला अटक केली पाहिजे."

बातम्या आणखी आहेत...