आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Vivek Oberoi To Play The Role Of Narendra Modi In The Biopic

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कन्फर्म/ नरेंद्र मोदींच्या बायोपिकमध्ये प्रमुख भूमिका साकारणार विवेक ओबेरॉय, टायटल असणार पीएम नरेंद्र मोदी

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूड डेस्क. 2019 मध्ये अनेक बायोपिक्स येणार आहेत. एनटीआर यांच्या कथानयकुडू बायोपिकपासून सुरुवात होत आहे. यानंतर डॉ. मनमोहन सिंह यांच्यावर तयार झालेला द अॅक्सीडेंटल प्राइम मिनिस्टर आणि यानंतर झांसीच्या राणीची कथा मणिकर्णिका मोठ्या पडद्यावर झळकणार आहे. या लिस्टमध्ये अजून एक नाव आहे ते म्हणजे नरेंद्र मोदी यांच्या बायोपिकचे. यामध्ये विवेक ऑबेराय नरेंद्र मोदींची भूमिका साकारताना दिसणार आहे. 

 

7 जानेवारीला रिव्हिल होणार पोस्टर 
1. ट्रेड एनालिस्ट तरण आदर्श यांनी ट्वीट करुन हे वृत्त कळवले. तरण यांनी लिहिले की, विवेक ओबेरॉय पीएम नरेंद्र मोदीमध्ये मोदींची भूमिका साकारत आहे. चित्रपटाचा फर्स्ट लूक पोस्टर 7 जानेवारीला समोर येणार आहे. तर याची शूटिंग जानेवारीपासून सुरु होणार आहे. 

IT’S OFFICIAL... Vivekanand Oberoi [Vivek Oberoi] to star in Narendra Modi biopic, titled #PMNarendraModi... Directed by Omung Kumar... Produced by Sandip Ssingh... First look poster will be launched on 7 Jan 2019... Filming starts mid-Jan 2019.

— taran adarsh (@taran_adarsh) January 4, 2019
2. डायरेक्शन ओमंग कुमार करणार आहेत. तर चित्रपटाचे प्रोडक्शन संदीप एस सिंह करणार आहेत. ओमंग यांनी यापुर्वी 6 वेळा वर्ल्ड बॉक्सिंग चॅम्पियन राहिलेल्या मेरीकॉमचा बायोपिक बनवला होता. यासोबतच त्यांनी रणदीप हुड्डा-ऐश्वर्या रायसोबतच सरबजीत हा बायोपिक बनवला आहे. 
3. यापुर्वी परेश रावल पीएम नरेंद्र मोदींची भूमिका साकारण्यासाठी पुर्णपणे तयार होते. पण अज्ञात कारणांमुळे परेश यांनी चित्रपट सोडला. चित्रपटाची तयारी दोन महिन्यांपुर्वीच सुरु झाली आहे. लोकसभा निवडणुकींपुर्वी शूटिंग पुर्ण केली जाणार आहे. 
4. चित्रपटात चहाची दुकान चालवणे, गुजरातच्या रोड ट्रांसपोर्ट कार्पेरेशनच्या कँटीनमध्ये स्टाफ म्हणून काम करणे, राजकारण, गुजरात सीएम पासून तर पंतप्रधान बनण्यापर्यंतचा प्रवास दाखवण्यात येणार आहे. चित्रपटाची जास्तीत जास्त शूटिंग गुजरातमध्येच केली जाईल.