आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Vivek Suhag Proposes Wrestler Babita Fogat In Haryanvi Style On The Set Of 'Nach Baliye 9'

'नच बलिए 9' च्या सेटवर विवेक सुहागने कुस्तीपटू बबीता फोगाटला हरियाणवी स्टाईलमध्ये केले प्रपोज

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूड डेस्क : 'नच बलिए' चे आगामी सीजन ग्लॅमर आणि मनोरंजनाने भरपूर आहे आणि या शोचे एक स्पर्धक कपल विवेक सुहाग आणि बबीता फोगाट पहिल्यापासूनच चर्चेत आहेत. झाले असे की, शोच्या शूटिंगदरम्यान सेटवरच विवेकने आपली भावी पत्नी बबिताला सुंदर पद्धतीने प्रपोज केले.  

 

हरियाणवी स्टाईलमध्ये केले प्रपोज...
शोच्या आगामी एपिसोडमध्ये विवेक नॅशनल टीव्हीवर मंगेतर बबीताला रेसलिंगचे काही खास जोक्स ऐकवत हरियाणवी स्टाईलमध्ये प्रपोज करताना दिसणार आहे. हा एपिसोड शूटझाला आहे. जेव्हा विवेकने बबीताला प्रपोज केले होते तेव्हा शोची संपूर्ण टीम तिथे उपस्थित होती. अशात जज रविना टंडनने विवेक ची फिरकी घेत त्याला विचारले, 'जर तू बबिताला एकट्यात भेटला तर तू तिला कसे प्रपोज करशील ?' याच्या उत्तरादाखल विवेक खूप गंभीरतेने आणि विनरतेने म्हणाला, 'जब तू कुश्ती लड़े है ना, जब तेरे चोट लगे हैं, मेरे दिल में घना दर्द होवे है.' विवकेच्या या स्टाईलने सर्वांचे मन जिंकले.  

 

रेसलिंग इव्हेंटमध्ये झाली होती विवेक-बबीताची भेट... 
विवेक आणि बबिता हरियाणाचे आहेत आणि हे दोघे एका रेसलिंग इव्हेंटमध्ये दिल्ली येथे 2014 मध्ये भेटले होते. नंतर दोघे योगायोगाने बबीताच्या कुस्तीच्या अकॅडमीमध्ये पुन्हा भेटले जिथे बबीताने स्वतः कुस्ती शिकली होती. यांची प्रेमकथा खूप चर्चित आहे आणि अनेकदा फॅन्सने या कपलला टीव्ही शोमध्ये पाहण्याची इच्छा व्यक्त केली होती जी आता 'नच बलिए' च्या माध्यमाने पूर्ण होत आहे. 

बातम्या आणखी आहेत...