आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Vivek Tiwari Killing: Faith In UP Government Says Apple Executive\'s Wife Kalpana Tiwari

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

UP सरकारवर पूर्ण विश्वास; पोलिस गोळीबारात ठार झालेल्‍या तिवारी यांच्‍या पत्‍नीची प्रतिक्रिया

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लखनऊ - उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊ येथील गोमतीनगर भागात एका पोलिस कॉन्स्टेबलने केलेल्या गोळीबारात ठार झालेले ‘अॅपल’चे एक्झिक्युटिव्ह विवेक तिवारी (३८) यांच्या कुटुंबीयांनी सोमवारी राज्याचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी भेट घेतली. आपला राज्य सरकारवर ‘विश्वास’ आहे, असे या भेटीनंतर कुटुंबीयांनी सांगितले.  

 

योगी आदित्यनाथ यांची भेट घेतल्यानंतर पत्रकारांकडे मनोगत व्यक्त करताना विवेक तिवारी यांची पत्नी कल्पना म्हणाल्या की, ‘राज्य सरकारवर माझा पूर्ण विश्वास आहे हे मी याआधीही स्पष्ट केले आहे. मुख्यमंत्र्यांची भेट झाल्यानंतर हा विश्वास आणखी दृढ झाला आहे. ही दुर्दैवी घटना घडायला नको होती. त्या दुर्घटनेनंतर कुठलीही भूमिका घेण्याची क्षमता मी गमावून बसले होते. त्या घटनेचा मोठा धक्का मला बसला होता. माझ्या पतीने माझ्यावर सोडलेली जबाबदारी पूर्ण करण्यास मी सक्षम राहीन असा विश्वास मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर मला आला आहे. माझ्या पतीच्या मृत्यूसाठी दोषी असलेल्यांवर कठोर कारवाई करावी, नोकरी, घर मिळावे; माझ्या मुलींच्या शिक्षणाचा आणि सासूच्या उदरनिर्वाहाचा खर्च मिळावा, अशा मागण्या मी केल्या होत्या. या सर्व मागण्या मंजूर करण्यात आल्या आहेत.’

 

असे आहे प्रकरण   
उत्तर प्रदेशचे पोलिस कॉन्स्टेबल प्रशांत चौधरी आणि संदीपकुमार यांनी शुक्रवारी रात्री गोमतीनगर भागात कार न थांबवल्याने विवेक तिवारी यांच्यावर गोळीबार केला होता. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला होता. या दोन्ही कॉन्स्टेबलच्या विरोधात एफआयआर दाखल करण्यात आला असून, त्यांना सेवेतून बडतर्फही करण्यात आले आहे.