Home | Business | Gadget | vivo v11 launch with in display fingerprint sensor and dual engine fast charging

Vivo V11 Pro लाँच, यामध्ये आहे इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर आणि 35 मिनिटात 70 टक्के चार्ज होणारी बॅटरी

दिव्य मराठी वेब टीम | Update - Sep 07, 2018, 01:14 PM IST

चीनी मोबाइल निर्माता कंपनी Vivo ने गुरुवारी मुंबईमध्ये झालेल्या लॉन्चिंग इव्हेंट दरम्यान आपल्या फ्लॅगशिप स्मार्टफोन Vivo

 • vivo v11 launch with in display fingerprint sensor and dual engine fast charging

  गॅजेट डेस्क: चीनी मोबाइल निर्माता कंपनी Vivo ने गुरुवारी मुंबईमध्ये झालेल्या लॉन्चिंग इव्हेंट दरम्यान आपल्या फ्लॅगशिप स्मार्टफोन Vivo V11 Pro लॉन्च केला. वीवोने आपल्या या स्मार्टफोनमध्ये इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर दिले आहे. हा स्मार्टफोन 6GB रॅम आणि 64GB स्टोरेज वेरियंटमध्ये लॉन्च करण्यात आला आहे. याची किंमत 25,990 रुपये आहे. याची बुकिंग 6 सप्टेंबरपासून सुरु होईल. तर फोन 12 सिप्टेंबरला पहिल्यांदा सेलसाठी उपलब्ध राहिल.

  कमी प्रकाशातही घेता येईल चांगला फोटो
  6.41 इंचच्या फुल व्ह्यू डिस्प्लेसोबत येणा-या Vivo V11 Proच्या रियरमध्ये कंपनीने 12+5 मेगापिक्सलचा ड्युअर कॅमेरा दिला आहे. याचा रियर कॅमेरा आर्टिफिशियल इंटेलिजेंसने लेस होईल आणि बोकेह मोडसोबत येईल. स्मार्टफोनचा कॅमेरा फक्त 0.03 सेकंदात ऑप्जेक्टवर फोकस करेल आणि कमी प्रकाशातही चांगला फोटो क्लिक केला जाऊ शकेल. स्मार्टफोनच्या फ्रंटमध्ये आर्टिफिशियल इंटेलिजेंसनसोबत येणारा 25 मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे.

  दोन कलर वेरियंटमध्ये उपलब्ध असेल फोन
  स्मार्टफोनमध्ये आर्टिफिशियल इंटेलिजेंससोबत येणारा ऑक्टा कोर क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 660 प्रोसेसर देण्यात आले आहे. यासोबतच फोनमध्ये 3,400mAh बॅटरीही देण्यात आली आहे. जी ड्युअल इंजन फास्ट चार्जिंग टेक्निकचा सपोर्ट करते. या टेक्निकच्या मदतीने स्मार्टफोनला फक्त 35 मिनिटांमध्ये 0 ते 70 टक्के चार्ज केले जाऊ शकेल. मायक्रो एसडी कार्डच्या मदतीने फोनचे स्टोरेज 256GB पर्यंत वाढवण्यात येईल. हा स्मार्टफोन डॅजलिंग गोल्ड आणि स्टेयरी नाइट ब्लॅक कलरमध्ये उपलब्ध असेल.

  मिळेल वन टाइम स्क्रीन रिप्लेसमेंट वारंटी
  हा स्मार्टफोन खरेदी करताना एचडीएफसी बँकच्या कार्ड्सचा वापर केल्यावर 2,000 रुपयांचे फ्लॅट कॅशबॅक मिळेल. यासोतबच फोनच्या लॉन्चिंग ऑफरच्या रुपात 4,050 रुपयांचा फायदाही मिळेल. स्मार्टफोनला वीवो वन टाइम स्क्रीन रिप्लेसमेंट वॉरंटी देत आहे.

Trending