न्यू लॉन्च / डुअल पॉप-अप सेल्फी कॅमेरा असलेला जगातील पहिला स्मार्टफोन व्हिव्हो V17 प्रो लॉन्च, किमंत फक्त 29,990 रुपये

VIVO V17 चा पहिला सेल 27 सप्टेंबरपासून सुरू होईल

दिव्य मराठी वेब

Sep 20,2019 06:22:00 PM IST

गॅजेट डेस्क- चीनी स्मार्टफोन कंपनी व्हिव्होने शुक्रवारी भारतीय बाजारात आपला लेटेस्ट स्मार्टफोन व्हिव्हो V17 प्रो लॉन्च केला. हा जगातील पहिला असा स्मार्टफोन आहे, ज्यात दोन पॉप-अप सेल्फी कॅमरे आहेत. फ्रंट आणि रिअर मिळून फोनमध्ये 6 कॅमरे आहेत. फोनच्या बॅक पॅनलऴर क्वाड रिअर कॅमरा सेटअप आहे, ज्यात 48 मेगापिक्सल प्रायमरी सेंसरदेखील आहे. याशिवाय सेल्फीसाठी यात 32 मेगापिक्सल आणि 8 मेगापिक्सलचे दोन कॅमरे आहेत. या फोनची किंमत 29,990 रुपये आहेत. याची प्री-बुकिंग आज(20 सप्टेंबर)पासून सुरू होईल, तर याचा पहिला सेल 27 सप्टेंबरला असेल.

डिस्प्ले साइज 6.44 इंच
डिस्प्ले टाइप फुल एचडी प्लस, E3 सुपर अॅमोलेड, 1080x2440 पिक्सल, गोरिल्ला ग्लास 5 प्रोटेक्शन
सिम टाइप डुअल नॅनो सिम
ओएस अँड्रॉयड 9 पाय
प्रोसेसर ऑक्टाकोर क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 675
रॅम 8 जीबी
स्टोरेज 128 जीबी
एक्सपांडेबल मेमरी 256 जीबी
रिअर कॅमरा 48MP(सुपर क्लेरिटी कॅमरा) + 8MP(सुपर वाइड-अँगल) + 2MP(डेप्थ/बुके सेंसर) + 13MP(टेलीफोटो सेंसर)
फ्रंट कॅमरा 32MP+8MP (पॉप-अल कॅमरा मोड्यूल)
सेंसर इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसर, प्रॉक्सिमिटी, एक्सीरेलोमीटर, कंपास, जायरोस्कोप
कनेक्टिविटी जीपीएस, 4जी, ब्लूटूथ 5.0, वाईफाई 802.11, यूएसबी टाइप सी पोर्ट, 3.5 एमएम हेडफोन जॅक
बॅटरी 4100 एमएएच विद 18W फास्ट चार्जर

भारतातील किंमत आणि ऑफर्स
VIVO V17 प्रो फक्त सिंगल व्हॅरिएंटमध्येच उपलब्ध आहे. याची किंमत 29,990 रुपये आहे. याला मिडनाइट ओशिअन आणि ग्लेसियर आइस कलरमध्ये लॉन्च करण्यात आले आहे.या स्मार्टफोनला ऑफिशिअल व्हिव्हो शॉप, फ्लिपकार्ट, अमेझॉन, पेटीएम मॉलवरुन खरेदी करता येईल. लॉन्चिंग ऑफरमध्ये फोनवर दोन हजार रुपयांचा एक्सचेंज डिस्काउंट मिळेल. HDFC आणि ICICI बँक क्रेडिट कार्डवरुन खरेदी केल्यावर 10% कॅशबॅकसहित नो-ईएमआय कॉस्ट आणि वन-टाइम फ्री स्क्रीन रिप्लेसमेंट वॉरेंटीदेखील मिळेल.

X
COMMENT