आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Video: मैत्रिणीच्या लग्नात असे थिरकले पुतिन; रशियन राष्ट्राध्यक्षांच्या Dance वर विरोधक आक्रमक

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

व्हिएना - रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी आपल्या मैत्रिणीच्या लग्नात केलेला डान्स सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. पुतिन ऑस्ट्रियाच्या परराष्ट्र मंत्री कॅरीन नीसल (53) यांच्या लग्नात प्रमुख अतिथी म्हणून सहभागी झाले. कॅरीन यांनी उद्योजक वूल्फगँग मिलिंजर यांच्याशी विवाह केला. या लग्नात त्यांनी कॅरीन यांच्या कंबरेवर हात ठेवून अतिशय सुंदर असे डान्स केले. नेहमीच शांत राहणारे पुतिन यांचे डान्स पाहून समारंभात टाळ्यांचा कळकळाट झाला. परंतु, त्यांच्याच देशात या डान्सवर टीका होत आहे. पुतिन आणि कॅरीन यांच्या वर्तनामुळे देशाची प्रतिमा मलीन झाली अशी टीका विरोधक करत आहेत.


ऑस्ट्रियातील गॅमिल्त्झ गावात हे लग्न समारंभ पार पडले. यामध्ये फर्त 100 जणांना निमंत्रण देण्यात आले होते. यावेळी पुतिन म्हणाले, "नवीन जोडप्यास सुखद संसाराच्या शुभेच्छा... अनेक प्रसंगांवर बोलणे आवश्यक नाही असे म्हटले जाते. परंतु, असे मुळीच नाही. मी नवरदेव आणि नववधूला त्यांच्या लग्नासाठी खूप-खूप शुभेच्छा देतो. रशियात लोक नवदांपत्याला बुद्धी आणि प्रेम वाढत राहण्याच्या शुभेच्छा देतात. मी देखील ईश्वराकडे हीच प्रार्थना करेन. नेहमीच सुखी आणि निरोगी राहा.''


विरोधी पक्षांकडून टीका
ऑस्ट्रियातील विरोधीपक्ष ग्रीन पार्टीने कॅरीन नीसल यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. ऑस्ट्रियाने नेहमीच युरोपियन संघ आणि रशिया यांच्याशी तटस्थ संबंध ठेवण्याची भूमिका घेतली आहे. अशात कॅरीन यांनी पुतिन यांच्या गळ्यात हात घालून डान्स करत देशाची आणि आपल्या पदाची प्रतिमा मलीन केली अशी टीका विरोधक करत आहेत. उल्लेखनीय बाब म्हणजे, युरोपियन आणि बाल्टिक देशांमध्ये युरोपियन संघ आणि रशिया यापैकी एकाची बाजू घेण्यावरून नेहमीच वाद होतात. त्यामुळे, अनेक युरोपियन राष्ट्र या युरोपियन संघ आणि रशियाशी तटस्थ संबंध ठेवण्याची भूमिका घेतात. युक्रेनचा वाद याच कारणामुळे झाला होता.

बातम्या आणखी आहेत...