आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामॉस्को- रशिया एका मोठ्या जहाजामधून एका परमाणू यंत्रणेला 6500 किमी दूर आर्कटिक सर्कलच्या मध्यभागी स्थापन करणार आहे. संपूर्ण जग पुतिन सरकारच्या या जोखिमीमुळे आश्चर्यचकित आहे, तर पर्यावरण प्रेमींनी याला ‘तरंगता विनाश’ असे संबोधले आहे. खरतर, रशियाने दोन दशकापूर्वीच आर्कटिकमध्ये ऊर्जेचे स्रोत तयार करण्याची योजना बनवली होती. त्यानंतर वैज्ञानिकांनी ‘अकॅडेमिक लोमोनोसोव’ परमाणु यंत्रणेला बनवणे सुरू केले.
काही दिवसांपूर्वी राष्ट्रपती व्लादिमीर पुतिन यांनी आर्कटिक विस्तार योजना लॉन्च केल्यानंतर या संत्रणेला बनवण्यामध्ये गती आणली आणि दोन वर्षामध्ये याला तयार करण्यात आले. रिपोर्ट्सनुसार, सध्या ही संत्रणा रशियातील पश्चिम भागातील मुरमांस्कमध्ये एका 472 फुट लांब प्लॅटफॉर्मवर ठेवली आहे. लवकरच याला आर्कटिकजवळील पेवेक बंदरावरून आर्कटिककडे रवाना केले जाईल. या यंत्रणेला आर्कटिकमध्ये कधी स्थापन केले जाईल, याबाबत कोणतेही माहिती अद्याप समोर आलेली नाहीये.
काय आहे परमाणू संत्रणेला आर्कटिकला नेण्याचा उद्देश?
पुतिन यांनी जोर दिल्यावर वैज्ञानिकांनी अतिशय कमी वेळात या प्रोजेक्टचे काम पूर्ण केले. पुतिन यांनी याआधीच सांगितले की, त्यांना रशिया आणि त्याच्या आसपासच्या परिसराला आर्थिकरित्या सक्षम बनवायचे आहे. त्यासाठीच ते आर्कटिक आत आसलेल्या तेल आणि गॅसला बाहेर काढणार आहेत. न्यूक्लिअर प्लांटच्या मदतीने याला शोधण्यासाठी लागलेल्या कंपन्यांना विज सप्लाय केले जाईल. सध्या रशियातील आर्कटिकजवळील परिसरात 20 लाख लोक राहतात, पण या परिसरातून देशाला 20% जीडीपी मिळतो.
पर्यावरण प्रेमिंनी केला विरोद
एकदा गंतव्यावर स्थापन झाल्यानतर हे उत्तरेकडील पहिला पॉवर प्लांट असेल. पण, पर्यावरणप्रमिंनी रशियाकडून केलेल्या एटमी संत्रणेच्या शिफ्टिंगला विरोध केला आहे. एक्सपर्ट्सचे म्हणने आहे की, एका परमाणू यंत्रणेला साफ आणि स्वच्छ परिसरात घेऊन गेल्याने तेथील लोकांवर याचा वाईट परिणाम होईल. ग्रीनपीस इंटरनॅशनलने याला "तरंगता विनाश"(फ्लोटिंग चेरनोबिल) नाव दिले आहे.
काय आहे चेरनोबिल?
या प्रोजेक्टच्या बाजुने बोलणाऱ्या लोकांचे म्हणने आहे की, पॉवर प्लांटमुळे कोणालाच धोका नाहीये. खरतर, सोवियत सरकारच्या अंतर्गत येणाऱ्या यूक्रेनमध्ये एप्रिल 1986 ला चेरनोबिल न्यूक्लिअर पॉवर प्लांटमध्ये सेफ्टी टेस्टदरम्यान स्फोट झाला होता, यात 31 जणांचा मृत्यू झाला होता, तर रेडिएशनमुळे कोट्यावधी लोकांवर त्याचा परिणाम पडल्याचा धोका निर्माण झाला होता. यूएनच्या 2005 च्या अंदाजानुसार, रेडिएशनमुळे देशभरातील 9 हजार पेक्षा अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. तर ग्रीनपीसने मृतकांचा आकडा दोन लाखांच्यावर सांगितला आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.