आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Vodafone Idea Shares Fell 24% And Airtel Shares Dropped 8% In Bad Quarterly Results.

वाईट तिमाही निकालात व्हाेडाफाेन आयडियाचे समभाग 24%तर एअरटेलचे शेअर्स 8% उसळले

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • दिलासा नाही दूरसंचार ऑपरेटर्ससमाेर नेटवर्क सुधारण्यासाठी भांडवल गुंतवण्याचे आव्हान कायम
  • बिगर दूरसंचार सेवांवर एजीआरवरून ऑपरेटर्स आणि डीओटीमध्ये मतभेद
  • सेवा समाप्त केलेल्या कंपन्यांकडून एजीआर वसूल करणे सरकारसमाेरील आव्हान

मुंबई : चालू आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीत व्हाेडाफाेन आयडिया आणि भारती एअरटेलला माेठे नुकसान झाल्याचे दिसले, असे असतानाही त्यानंतरच्या दिवसांत कंपन्यांच्या समभागांमध्ये माेठी तेजी दिसली. व्हाेडाफाेन अायडियाचे समभाग २४.७५%च्या तेजीसह ३.६८ रुपयांवर पाेहाेचले आणि भारती एअरटेलचे समभाग ८.४२% च्या तेजीसह ३९२.२० रुपयावर बंद झाले. दाेन्ही कंपन्यांसमाेरील आव्हाने कायम आहेत. केपीएमजीमध्ये भागीदारी आणि दूरसंचारप्रमुख पुरुषाेत्तम यांच्या म्हणण्यानुसार, कोर्टाच्या निकालामुळे नेटवर्क सुधारण्यासाठी लागणाऱ्या भांडवलावर परिणाम हाेईल.


१९९४ मध्ये राष्ट्रीय दूरसंचार धाेरणाचे उदारीकरण झाले हाेते. यानंतरही त्यात सुधारणा केल्या गेल्या हाेत्या. परवाना घेणाऱ्या कंपन्यांना ग्राॅस रेव्हेन्यूच्या एक तृतीयांश वाटा शुल्क रूपात सरकारला द्यायचा हाेता. दूरसंचार विभागाच्या म्हणण्यानुसार, गणना कंपनीला हाेणाऱ्या सर्व महसुलावरही हाेईल, दुसरीकडे अाॅपरेटर्सच्या म्हणण्यानुसार, बिगर दूरसंचार सेवांवर एजीअार देणार नाहीत, मात्र दूरसंचार विभाग त सहमत नाही.

१५ कंपन्यांमध्ये सर्वात जास्त परिणाम व्हाेडाफाेन व एअरटेलवर
एकेकाळी देशात दूरसंचार सेवा देणाऱ्या १५ कंपन्या हाेत्या, मात्र सध्याच्या स्थितीत बहुतांश कंपन्यांना एक तर अन्य काेण्या कंपनीने खरेदी केले किंवा त्यांची सेवा बंद झाली आहे. एजीआरमुळे सर्वात जास्त परिणाम व्हाेडाफाेन आयडिया आणि भारती एअरटेलवर झाला आहे. निकालाचा परिणाम आणखी वाढू शकताे आणि ताे इंटरनेट सर्व्हिस प्राेव्हायडर, नॅशनल लाँग डिस्टंट (एनएलडी) व इंटरनॅशनल लाँग डिस्टन्स (आयएलडी) सेवा देणाऱ्यांवर पडू शकताे. यामध्ये आरकाॅम, टाटा टेलिसर्व्हिसेस,एअरसेल आहेत.

शुल्क समाप्त करण्यात विलंबामुळे स्वस्त सेवांवर परिणाम :जिओ
जिओ रिलायन्स जिओने शुक्रवारी सांगितले की, काॅल जाेडण्यावर लावले जाणारे शुल्क समाप्त करण्याचा निर्णय जानेवारी २०२० नंतर लांबणीवर टाकल्यास त्यामुळे स्वस्तातील दूरसंचार सेवेवर परिणाम हाेईल. नि:शुल्क व्हाॅइस काॅलसारख्या स्वस्तातील सेवांमुळे ग्राहकांना फायदा झाला आहे. रिलायन्स जिओने सांगितले की, आता इन्कमिंग आणि आऊटगाेइंग काॅलचे प्रमाण समान झाले आहे. अशा स्थितीत बिल अँड किप' व्यवस्था टाळली जावी.

२,००००० काेटी रुपयांपर्यंत पाेहाेचू शकते दाव्याची रक्कम
कोर्टाच्या निकालानंतर कंपन्यांना ९३,००० काेटी रुपये चुकवण्याचे आदेश बजावले हाेते. मात्र, कर, व्याज आदींमुळे ही रक्कम १.४ लाख काेटी आहे.ती वाढून २ लाख काेटीपर्यंत पाेहाेचू शकते. दूरसंचार अाॅपरेटर्सची समस्या पाहता सरकारने एक पॅनल स्थापन केले आहे. भारती एअरटेल समूहावर ६२,१८७.७३ काेटी रुपये, व्हाेडाफाेन आयडियावर ५४,१६३.९ काेटी रुपये थकीत आहेत. रिलायन्स कम्युनिकेशन्स व बंद पडलेल्या एअरसेलवर ३२,४०३.४७ काेटी रु.आहेत.

माेबाइल दर घटवण्यात मत मागितले नाही : ट्राय
दूरसंचार विभागाने माेबाइल फाेन सेवांच्या शुल्कात किमान दर मर्यादा किंवा माेबाइल सेवांंचे किमान शुल्क ठेवण्याबाबत ट्रायने काेणतेही मत मागितले नाही. ट्रायचे चेअरमन आर. एस. शर्मा यांनी ही माहिती दिली. दूरसंचार विभागाने शुल्क निश्चित करण्यासाठी ट्रायशी संपर्क करण्याच्या प्रश्नावर म्हणाले,त्यांना अशा प्रकारची विनंती मिळाली नाही. सरकारने दूरसंचार क्षेत्राच्या मदत पॅकेजसाठी सचिवांची समिती स्थापन केली हाेती.

आढावा कालावधीदरम्यान एअरटेलने कमावला ६,००,००० काेटी रु. महसूल
न्यायालयाच्या निकालानंतर सर्वात जास्त परिणाम साेसणारी एअरटेल अाणि व्हाेडाफाेन आयडियाने यादरम्यान अनुक्रमे ६,००,००० काेटी रुपये आणि ३,५०,००० काेटी रुपये महसूल कमावला. ३१ मार्च २०१९ च्या आकड्यांच्या आधारे एअरटेलवर ७५,००० काेटी रुपयांचे कर्ज आहे, तर व्हाेडाफाेनवर १,१०,०० काेटी रुपये कर्ज आहे. एअरसेल आणि आरकाॅमने याआधीच एनसीएलटीकडे अर्ज केला आहे. त्यामुळे त्यांच्याकडून शुल्क वसूल करणे कठीण ठरेल. टेलीनाॅर, एमटीएस, व्हिडिअाेकाॅन आदींचा परवाना रद्द केला आहे.

बातम्या आणखी आहेत...