Home | Business | Gadget | Vodafone launches yearly prepaid plan in just 1,499 rupees

वोडाफोनने आणला जिओपेक्षाही स्वस्त प्लान, फक्त इतक्या रूपयात मिळणार सर्वकाही फ्री

दिव्य मराठी वेब टीम | Update - Jan 14, 2019, 12:20 AM IST

दीर्घ कालावधीसाठी सर्वात स्वस्त प्लान

 • Vodafone launches yearly prepaid plan in just 1,499 rupees


  नवी दिल्ली : रिलायन्स जिओ आणि सरकारी कंपनी भारत संचार निगम लिमिटेडला टक्कर देण्यासाठी वोडाफोन-आयडियाने आपल्या ग्राहकांसाठी एक धमाकेदार ऑफर घेऊन आले आहे. या ऑफरमुळे कॉलिंग, डेटा सहित सर्वसुविधा एका वर्षासाठी फ्री मिळणार आहेत.

  हा आहे प्लान
  वोडाफोन-आयडियानुसार, त्यांनी आपर्या ग्राहकांसाठी एक वर्ष कालावधी असलेला प्लान लाँच केला आहे. 1499 रूपयांमध्ये हा प्लान उपलब्ध आहे. या प्लानमध्ये वोडाफोन-आयडिया ग्राहकांना 365 दिवसांसाठी कॉलिंग, डेटा आणि एसएमएसची सुविधा कोणत्याही इतर शुल्कविना मिळणार आहे. तसेच यामध्ये ग्राहक दररोज 1 जीबी 3जी/4जी डेटा, दररोज 100 एसएमएस आणि अनलिमिटेड कॉलिंगचा लाभ घेऊ शकणार आहेत.


  रोमिंगमध्येही मिळणार लाभ
  वोडाफोन-आयडियाच्या या प्लानमध्ये ग्राहकांना रोमिंगमध्येही अनलिमिटेड कॉलिंग, डेटा आणि एसएमएसची सुविधा कोणत्याही इतर शुल्कविना लाभ घेता येणाह आहे. याशिवाय ग्राहकांना या प्लानमध्ये वोडाफोन प्लेचे सब्सक्रिप्शन देखील मिळणार आहे.


  जिओसोबत आहे मुख्य स्पर्धा
  वोडाफोन-आयडियाने रिलायन्स जिओच्या 1699 च्या प्लानला टक्कर देण्यासाठी 1499 रूपयांचा प्लान लाँच केला आहे. रिलायन्स जिओच्या 1699 रुपयांच्या प्लानमध्ये मोफत कॉलिंग, रोज दीड जीबी डेटा आणि दररोज 100 एसएमएसची सुविधा मिळते. सोबतच यामध्ये जिओ टीव्ही, जिओ मूव्हीज आणि जिओ सावन समवेत इतर अॅप्सचे सब्सक्रिप्शन मोफत मिळते.

Trending