• Home
  • Business
  • Gadget
  • Vodafone Vodafone Idea launched Rs. 159 Prepaid Plan With 1GB Daily Data To Take On Jio And Airtel

35 रूपयाच्या रिचार्जसोबत / 35 रूपयाच्या रिचार्जसोबत पुन्हा सुरू झाली टेलीकॉम कंपन्यांमध्ये स्पर्धा, Vodafone-Idea ने मिळून लॉन्च केला 159 रूपयाचा प्लान; Jio-Airtelला टक्कर देण्यासाठी महिनाभरात इतके काही देणार

दिव्य मराठी वेब टीम

Dec 05,2018 12:40:00 PM IST

न्यूज डेस्क - एअरटेल, वोडाफोन आणि आयडिया या टेलिकॉम कंपन्यांनी आपल्या ग्राहकांना किमान 35 रूपयाचे रिचार्ज करणे अनिवार्य केले आहे. आपल्याला जर आपल्या नंबरची सेवा खंडीत होऊ नये यासाठी किमान 35 रूपयाचे रिजार्च करावेच लागणार आहे. कंपन्यांच्या या पॉलिसीमुळे जिओला टक्कर मिळण्याची शक्यता आहे. सोबतच वोडाफोन आणि आयडिया यांचे विलीनीकरणाने एअरटेलला देखील स्पर्धा मिळाली आहे. याच संधीचा फायदा घेत Vodafone-Idea ने आपला नवा प्लान लॉन्च केला आहे.


Vodafone-Idea चा 159 रूपयाचा प्लान
> यामध्ये युजरला दररोज 1 जीबी 4G डेटा मिळणार आहे. सोबतच अनलिमिटेड व्हाइस कॉल आणि दररोज 100 SMS चा फायदा मिळणार आहे. या प्लानमध्ये नॅशनल रोमिंग फ्री देण्यात आली आहे. या प्लानची वैधता 28 दिवस असणार आहे. देशातील 22 सर्कलमध्ये या प्लानचा फायदा घेता येणार आहे.

Airtel चा 149 रूपयाचा प्ला
> Airtel चा 149 रूपयाचा प्लान आधीपासूनच आहे. यामध्ये यूजरला 28 दिवसांच्या वैधतेसह इनकमिंग-आऊटगोइंग कॉल्ससह रोमिंग आणि डेली 100 SMS फ्री मिळत आहे. यामध्ये डेली 1 जीबी डेटा देण्यात येत आहे.


Jio चा 149 चा प्लान
> Jio च्या 149 रूपयाच्या प्लानमध्ये 28 दिवसांची वैधता देण्यात आली आहे. सोबतच़ इनकमिंग-आऊटगोइंग कॉल्स आणि रोमिंग फ्री देण्यात येत आहे. तसेच यूजरला डेली 1GB डेटासह डेली 100 SMS फ्री देण्यात आले आहेत.

X
COMMENT