आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इव्हेंटमध्ये बोल्ड ड्रेस घालून पोहोचली करीना, सोशल मीडिया यूजर करत आहेत ट्रोल

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई. गेल्या रात्री मुंबईमध्ये 'वोग वुमन ऑफ द ईयर अवॉर्ड 2018' होस्ट करण्यात आला होता. येथे रेड कार्पेटवर बॉलिवूडच्या अभिनेत्री ग्लॅमरस अंदाजात अवतरल्या होत्या. अवॉर्ड फंक्शनमध्ये करीना शायनी गाउन घालून पोहोचली. तिचा हा आउटफिट खुप बोल्ड होता. एवढा बोल्ड गाउन घातल्यामुळे करीनाला सोशल मीडियावर ट्रोल केले जात आहे. सोशल मीडिया यूजर्स तिला या ड्रेसमुळे निर्लज्ज महिला असे संबोधत आहेत. काही ट्रोलर्स म्हणाले की, तु भारतात राहते की, अमेरिकेत असा प्रश्नही केला. करीनाला या इव्हेंटमध्ये मोस्ट स्टायलिश अॅक्ट्रेसचा अवॉर्ड मिळाला आणि हा अवॉर्ड तिला तिची बहीण करिश्मा कपूरने दिला. 

 

वडिलांसोबत बोल्ड लूकमध्ये दिसल्या जान्हवी आणि आलिया 
- यावेळी आलिया भट वडील मुकेश भट यांचा हात पकडून बोल्ड लूकमध्ये रेड कार्पेटवर अवतरली. रेड कार्पेटवर आलिया वडिलांसोबत मस्ती करताना दिसली. 
- जान्हवी कपूरही वडील बोनी कपूर यांच्यासोबत पोहोचली. जान्हवीने यावेळी गोल्डन कलरचा स्टायलिश गाऊन घातला होता. हा खुप लांब होता, हा सावरणे तिला अवघड जात होते. 

 

अवॉर्ड शोमध्ये पोहोचले अनेक सेलेब्स 
अवॉर्ड फंक्शनमध्ये मोनी रॉय, राधिका आपटे, विक्की कौशल, राणा दुग्गूबती, प्रिती झिंटा, नुसरत भरुचा, मंदिरा बेदी, कुणाल कपूर, कार्तिक आर्यन, करण जोहर, ईशान खट्टर, इलियाना डिक्रूज, फातिमा सना शेख, आयुष्मान खुराना, अपारशक्ती खुरानासोबतच अनेक सेलेब्स पोहोचले. 
 

बातम्या आणखी आहेत...