आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

माझ्या लग्नात करण जोहर होता सर्वोत्कृष्ट डान्सर, सोनमने शेअर केल्या तिच्या लग्नातील गोष्टी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वूट ओरिजिनलवरील 'फीट अप विद द स्टार्स' हा शो अनायता श्रॉफ अदजानिया होस्ट करत आहे. या शोमध्ये अनायता बॉलिवूडच्या स्टार्सना बेडवर गप्पा मारण्यासाठी आमंत्रित करत असते. अलीकडेच अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस या शोची स्पेशल गेस्ट होती. तर आता बॉलिवूडची फॅशनिस्टा सोनम कपूरने या शोमध्ये हजेरी लावली.  या शोमध्ये अनायतासोबत सोनमने तिच्या लग्नातील काही खास गोष्टी शेअर केल्या आहेत. याचवर्षी मे महिन्यात सोनम तिचा बॉयफ्रेंड आणि दिल्लीतील व्यावसायिक आनंद आहुजासोबत विवाहबद्ध झाली आहे. 

 

सोनमने तिच्या लग्नातील आठवणींना उजाळा देताना सांगितले, 'माझ्या लग्नात करण जोहर सर्वोत्कृष्ट डान्सर होता.  तर रेहा ही उत्तम करवली होती." लग्न हे माझे स्वप्न होते. मी या दिवसाची आतुरतेने वाट बघत होती, असेही सोनम यावेळी म्हणाली. 

 

 

रणवीर आणि अर्जुन यांनी लग्नात गाणे गायले तर अनिल कपूर, सलमान खान आणि शाहरुख खान यांनी धमाकेदार डान्स लग्नात केल्याचेही सोनमने यावेळी सांगितले. 

 

बातम्या आणखी आहेत...