आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आधारसारखे मतदान ओळखपत्रही होणार ऑनलाइन अपडेट

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

इंदूर - मतदान ओळखपत्रात नाव, पत्ता, जन्म तारीख बदलायची असेल, नवे नाव नोंदवायचे किंवा काढायचे असेल तर मतदारांना निवडणूक अधिकारी कार्यालयांत जाण्याची गरज नाही. निवडणूक आयोग आपले नॅशनल व्होटर सर्व्हिस पोर्टल अपडेट करत आहे. यात मतदारांना वेगळे व्होटर कार्ड खाते मिळेल. व्होटर कार्ड नंबरवर (इपिक) क्लिक केले की बँक खात्यासारखे त्याचे खाते उघडेल. यात मतदार नाव, पत्ता, जन्म तारीख किंवा इतर माहितीत बदल करू शकेल. पुरावेही अपलोड करू शकेल. यानंतर मोबाइलवर ओटीपी येईल. निवडणूक अधिकाऱ्याने २४ तासांत ही माहिती पडताळून दुरुस्ती करावी लागेल. साॅफ्टवेअर अपडेट झाल्यावर जेव्हा मतदार ओळखपत्रावर पत्ता बदलू इच्छित असेल तेव्हा नवी माहिती जुन्या व्होटर कार्ड नंबरवरच अपलोड होईल. म्हणजेच कार्ड युनिक राहील.

बातम्या आणखी आहेत...