आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भाजपच्या भ्रष्ट मंत्र्यांना मतदारच जागा दाखवतील

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

परभणी : भारतीय जनता पक्षाच्या राज्यातील सरकारमध्ये सर्वाधिक भ्रष्ट मंत्र्यांचा समावेश असून या सरकारने जनतेची दिशाभूल केल्याने येत्या निवडणुकीत मतदारच त्यांना त्यांची जागा दाखवतील, असे मत राष्ट्रवादी काँग्रेसच्या खा.सुप्रिया सुळे यांनी मंगळवारी (दि.दहा) जिंतूर येथे केले.

खा. सुप्रिया सुळे यांनी संवाद यात्रेत जिंतूर येथील जिल्हा परिषदेच्या मैदानावर झालेल्या जाहीर सभेत भाजप सरकारवर कडाडून टीका केली. त्या म्हणाल्या, नोटबंदी सपशेल फोल ठरल्याने देशाची अर्थव्यवस्था डबघाईस आली. या सरकारच्या काळात राज्यात सर्वाधिक शेतकरी आत्महत्या झाल्या असताना हे सरकार जनतेची दिशाभूल करण्याचे काम करीत आहे. महिलांच्या प्रश्‍नांवर बोलताना बचत गटांच्या माध्यमातून महिला आर्थिक सक्षमीकरणासाठी शासन दरबारी प्रयत्न करीत असल्याचेही त्या म्हणाल्या. जिल्हाध्यक्ष आ.बाबाजानी दुर्राणी यांनी खा.सुळे यांना मिळालेल्या संसदरत्न पुरस्काराबद्दल अभिमानाची बाब असल्याचे मत व्यक्त करीत सरकार जातीयवाद वाढवण्यास कारणीभूत असल्याचा आरोप केला. आ. भांबळे यांनीही मनोगतात शासनाच्या विविध योजनांच्या माध्यमातून ५०० कोटीपेक्षा जास्त निधी सरकार नसताना खेचून आणल्याचे नमूद केले. प्रास्ताविक प्रेक्षा भांबळे यांनी केले. कार्यक्रमास प्रा.यशवंत गोसावी, संभाजी ब्रिगेडचे छगन शेरे, जि. प. अध्यक्षा उज्वला राठोड, सारंगधर महाराज, शालिनी राऊत, इंदूबाई घुगे, मीनाताई राऊत आदींची उपस्थिती होती.

माजी आ.बोर्डीकरांवर टीकास्त्र
मेळाव्यात आ.विजय भांबळे यांनी माजी आ.रामप्रसाद बोर्डीकर यांच्यावर अप्रत्यक्षरीत्या टीका करताना जिंतूर तालुक्यातील काही लोक एरवी पाच वर्षे गायब होतात. मात्र निवडणूक आली की प्रकटतात. मतदारसंघाच्या विकासासाठी त्यांना काहीही देणेघेणे नाही, असा टोला लगावला.

बातम्या आणखी आहेत...