आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Voting Begins In 91 Seats Of Third Phase Of Lok Sabha Election

PHOTOS: 10 एप्रिल... या दिग्गजांनी बजावला सकाळी-सकाळी मतदानाचा अधिकार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - लोकसभा निवडणुकीच्या तिस-या टप्प्यातील मतदानाला आज सकाळी सुरवात झाली. देशभरतील 91 मतदारसंघात आज मतदान होत आहे. यात महाराष्ट्रातील विदर्भातील 10 जागांचा समावेश आहे. दिल्ली, बिहार आणि उत्तर प्रदेशसह 11 राज्यांमध्ये आज मतदान होत आहे. सर्वसामान्यांसोबतच अनेक दिग्गजांनी सकाळीच मतदानाचा अधिकार बजावला आहे.

विदर्भातील 10 जागांसाठी मतदान होत आहे. एक-एक मत महत्त्वाचे आहे. याची जाणिव दिग्गजांना देखील आहे. त्यामुळे मतदान केंद्राबाहेर अनेक दिग्गज नेते पाहायला मिळाले. विदर्भात ऊन जास्त असते त्यामुळे मतदारही सकाळीच मतदान करण्यासाठी गर्दी करीत आहेत.
इलेक्शन : फेसबुकचे नवे फीचर
फेसबुकने भारतीय मतदारांसाठी ‘आय अॅम व्होटर’ हे नवे अभिनव फीचर सुरू केले आहे. यानुसार न्यूजफीडमध्ये एक संदेश दिसेल. हे फीचर मतदानाच्या दिवशी त्या-त्या भागातील फेसबुक युर्जसना दिसेल.

पुढील स्लाइडमध्ये पाहा, मतदानाचा हक्क बजावलेले दिग्गज नेते..