आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मतदान केंद्र महाराष्ट्रात, मतदारांच्या रांगा मात्र सीमेवरील गुजरात राज्यापर्यंत

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवापूर - देशविदेशात सीमांवरून अनेक वाद होतात. परंतु महाराष्ट्र-गुजरात सीमावर्ती भागातील नवापूर शहरातील जिल्हा परिषदेच्या शाळेत गुजराती आणि मराठी भाषिक मतदार एकत्रित होऊन मतदान करतात. शाळेवरील हे मतदान केंद्र महाराष्ट्राच्या सीमेत आहे. परंतु, शाळेच्या प्रवेशद्वाराबाहेर गुजरात राज्याची सीमा लागते. सोमवारी या ठिकाणी लोकसभेचे मतदान पार पडले. परंतु, तापमान जास्त असल्याने मतदारांनी सायंकाळच्या वेळेत गर्दी केली. त्यामुळे त्यांची रांग थेट प्रवेशद्वाराबाहेर गेली. या मतदान केंद्राची भौगोलिक परिस्थिती खूप रंजक आहे. पूर्व राज्यात महाराष्ट्र राज्य आहे. पश्चिम, दक्षिण आणि उत्तर दिशेत गुजरात राज्य येते. या भागातील काही मतदारांना मतदान करण्यासाठी गुजरात राज्यातून पुन्हा महाराष्ट्र राज्यात यावे लागते.  देशाच्या विकासाचा मार्ग गुजरात राज्यातून जातो, असे संकेत २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत रूढ झाले. परंतु नंदुरबार लोकसभा निवडणुकीत प्रतिनिधींना मतदान करण्याचा मार्गही गुजरात राज्यातून जातो. या अजबगजब मतदारसंघाचे वास्तव चित्र “दिव्य मराठी’ने समोर आणले आहे.

 

महाराष्ट्र-गुजरातच्या फाळणीपूर्वीचे केंद्र 
मे १९६० मध्ये मुंबई प्रांतातून महाराष्ट्र व गुजरात राज्यांची फाळणी होऊन निर्मिती झाली. परंतु हे मतदान केंद्र त्याहून जुने आहे. १९५२ पासून मतदानाचा हक्क नागरिक बजावत आहेत. महाराष्ट्र राज्यातील नवापूर जिल्हा परिषद गुजराती स्टेशन शाळेची स्थापना १९२७ ची ब्रिटिशकालीन आहे. सध्या एकूण ८०३ मतदार आहेत. नवापूर शहरातील खाखरफळी आणि रेल्वेस्टेशनवरील मतदार या केंद्रात मतदान करतात.

 

१९५२ पासून लोकशाही जपणारा मतदार
नवापूर शहरातील भिकाजी बालाजी टिभे (८९, जुनी पोस्ट गल्ली, नवापूर) हे १९५२ च्या पहिल्या निवडणुकीपासून मतदानाचा हक्क अखंडितपणे बजावत आहेत. लोकसभा, विधानसभा, ग्रामपंचायत, त्यानंतर पालिकेत मतदान केले आहे. नंदुरबारचे पहिले खासदार जयंतराव नटावदकरांपासून तर सध्या खासदार डाॅ.हिना गावित यांच्यापर्यंतचा कार्यकाळ त्यांनी बघितला आहे.

 

 

बातम्या आणखी आहेत...