आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अमरावती, औरंगाबाद आणि जामखेडमध्ये मतदानाला लागले गालबोट

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमरावती जिल्ह्यात ‘स्वाभिमानी’च्या उमेदवाराची कार पेटवून जिवंत जाळण्याचा प्रयत्न
अमरावती जिल्ह्यातील मोर्शीतील स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे उमेदवार देवेंद्र भुयार व त्यांच्या दाेन सहकाऱ्यांना मारहाण करून त्यांची कार पेटवून देण्यात आली. ही घटना साेमवारी पहाटे पाच वाजताच्या सुमारास शेंदुरजनाघाट- मालखेड मार्गावर घडली. सहा अज्ञात व्यक्तींविरुद्ध गुन्हे दाखल झाले आहेत.
 

औरंगाबादेत राष्ट्रवादी, एमआयएम कार्यकर्त्यांमध्ये तुंबळ हाणामारी
औरंगाबाद | बाेगस मतदानाच्या आराेपावरून औरंगाबादेतील कटकट गेट भागात एमआयएम व राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांत सोमवारी सायंकाळी जोरदार हाणामारी झाली. खासदार इम्तियाज जलील यांनाही धक्काबुक्की झाली. त्यामुळे या भागात काही काळ तणावाचे वातावरण हाेते. दरम्यान, पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने जमाव नियंत्रणात आला.
 

जामखेडमध्ये मतदानाला जाताना भाजप कार्यकर्त्यांवर राष्ट्रवादीच्या युवकांचा चाकूहल्ला; दाेन जण जखमी
जामखेड | बांधखडक (ता. जामखेड) येथे मतदानाला जाताना भाजप व राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन गटांत मारामारी झाली. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या चाकूहल्ल्यात भालेराव वनवे व हर्षवर्धन फुंदे हे भाजप कार्यकर्ते जखमी झाले.  पोलिसांनी पाच जणांना ताब्यात घेतले आहे. 
 
 

बातम्या आणखी आहेत...