आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

छत्तीसगड : दुसऱ्या टप्प्यात 4 वाजेपर्यंत 58.47 टक्के मतदान, काँग्रेसची ईव्हीएममध्ये छेडछाडीटी तक्रार

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

रायपूर - छत्तीसगड विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील मतगदानाला सकाळीच सुरुवात झाली आहे. येथील 72 जागांसाठी आज मतदान होत आहे. दुपारी 4 वाजेपर्यंत 58.47% टक्के मतदानाची नोंद झाली आहे. दरम्यान अनेक ठिकाणी ईव्हीएम बिघाडामुळे काँग्रेसने ईव्हीएममध्ये छेडछाड केल्याची तक्रार केली आहे. 

 

रायपूर, रायपूर ग्रामीण, कवर्धा, जांजगीर चांपा, दुर्ग आणि बालोदसह अनेक मतदार संघातील मतदान केंद्रांचा समावेश आहे. त्यामुळे सक्तीचे भाजप उमेदवार मेघराम साहू तासभर मतदानासाठी रांगेत उभे होते. दुसऱ्या टप्प्यामध्ये एकूण 1079 उमेदवार मैदानात आहेत. त्यात भाजपचे 9 मंत्री आणि मुख्यमंत्री पदाची दावेदारी सांगणाऱ्या काँग्रेसच्या तीन उमेदवारांची प्रतिष्ठाही पणाला लागली आहे. 

 
Updates 

 

- रायपूरच्या एका महिला बूथमध्ये ईव्हीएममधील बिघाडामुळे 9:50 पर्यंत मतदान सुरू होऊ शकले नाही. त्यामुळे अनेक महिला मतदान न करता परतल्या. त्यामुळे काँग्रेस कार्यकर्त्यांनी गदारोळ केला. 

- जनता कांग्रेस छत्तीसगडचे प्रमुख अजित जोगी आणि त्यांचा मुलगा अमित जोगी यांनी पेंड्रा येथे मतदान केले. 

- रायपूर दक्षिणच्या दोन बूथ क्रमांक 126 आणि 129 मध्ये ईव्हीएम खराबीमुळे अतदान थांबले. 
- जागरूकतेसाठी राबवण्यात आलेल्या स्वीप कार्यक्रमाचा सकारात्मक परिणाम महिला मोठ्या संख्येने मतदानासाठी निघाल्या. 
- छत्तीसगडचे मुख्य निवडणूक अधिकारी सुब्रत साहू यांनी कुटुंबासह मतदान केले. 
- जिल्हाधिकारी पदाचा राजीनामा देऊन भाजपमध्ये प्रवेश केलेले ओपी चौधरी यांनी प्रथमच स्वतःसाठी मतदान केले. 
- बालोदमधील भाजप उमेदवार पवन साहू पोलिंग बूथ परिसरात घुसले त्यांनी हात जोडत मतदारांना मतदानाची विनंती केली. पोलिस येण्याआधी ते निघूनही गेले. 

 

सकाळी 8 वाजता दुसऱ्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात झाली आहे. सायंकाळी 5 वाजेपर्यंत मतदान होईल. पहिल्या टप्प्यातील 18 जागांवर 12 नोव्हेंबरला 76.28 टक्के मतदान झाले होते. गेल्यावेळी याठिकाणी 75.93 टक्के मतदान झाले होते. म्हणजे ही टक्केवाली 0.35 टक्क्यांनी वाढली. राज्यातील 90 जागांचे निकाल 11 डिसेंबर रोजी लागतील. 

बातम्या आणखी आहेत...