आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नक्षलवाद्यांच्या धमक्यांना भीक न घालता गडचिराेली जिल्ह्यातील वेंगणूरवासीयांनी १३ किमी पायपीट करून बजावला मतदानाचा हक्क

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नागपूर - नक्षलवाद्यांनी मतदानावर बहिष्कार घालण्याचा इशारा दिला असतानाही गडचिरोली जिल्ह्यातील वेंगणूर येथील नागरिकांनी नक्षलवाद्यांच्या धमक्यांना न जुमानता तब्बल १३ किलोमीटरचा पायी आणि बोटीने प्रवास करीत मतदान केंद्र गाठले व मतदानाचा हक्क बजावत आदर्श उदाहरण घालून दिले. नक्षलवाद्यांनी एटापल्ली तालुक्यात मतदानावर बहिष्कार घालण्याचा इशारा देणारे बॅनर्स अनेक ठिकाणी लावले होते. मात्र, नक्षलवाद्यांच्या धमक्यांना वेंगणूर येथील नागरिकांनी भीक घातली नाही. सुरक्षेच्या कारणास्तव वेंगणूर येथील मतदान केंद्र रेगडी येथे हलवण्यात आले होते. मात्र, मतदानाचा हक्क बजावण्यासाठी वेंगणूर येथील गावकऱ्यांनी १३ किलोमीटरचा पायी आणि कन्नमवार जलाशयातून बोटीने प्रवास करीत रेगडी गाठले. या गावकऱ्यांचा उत्साह पाहून गडचिरोली पोलिस दलाच्या वतीने प्रभारी अधिकारी खापरे यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. नक्षलवाद्यांच्या धमक्यांना न जुमानता मतदानात सहभागी झाल्याबद्दल पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनीही या मतदारांचे कौतुक केले.
 

‘बॅलेट’च जिंकलं 
मतदानावर बहिष्कार घालण्याचा इशारा नक्षलवाद्यांनी दिला होता. नक्षलवाद्यांच्या धमक्यांना भीक न घालता वेंगणूर येथील गावकऱ्यांनी १३ किलोमीटर पायी आणि कन्नमवार जलाशयातून बोटीने प्रवास करीत रेगडी मतदान केंद्र गाठले व मतदानाचा हक्क बजावत आदर्श उदाहरण घालून दिले. पोलिसांनी या गावकऱ्यांचे पुष्पगुच्छ देऊन कौतूक केले.