दुसऱ्या टप्प्यातही मतांचा टक्का घटला; पाच वाजेपर्यंत ५७.२२ टक्के मतदान; २०१४ च्या निवडणुकीत झाले हाेते ६२.३८ % मतदान

प्रतिनिधी

Apr 19,2019 08:33:00 AM IST

मुंबई - लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात गुरुवारी राज्यातील दहा मतदारसंघात सायंकाळी पाच वाजेपर्यंत सरासरी ५७.२२ टक्के मतदान झाले. सायंकाळी ६ नंतरही काही मतदान केंद्रांवर मतदारांच्या रांगा असल्याने मतांची अंतिम टक्केवारी शुक्रवारी जाहीर करण्यात येईल. काही ठिकाणी किरकोळ घटना वगळता आज सर्वत्र शांततेत मतदान पार पडले, अशी माहिती राज्याचे अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी दिलीप शिंदे यांनी दिली.


पहिल्या टप्प्यात ७ मतदारसंघांसाठी ११ एप्रिल राेजी मतदान राेजी मतदान झाले. त्यात गडचिराेली वगळता सरासरी ६१.८१ टक्के मतदानाची नाेंद झाली हाेती. २०१४ च्या तुलनेत दाेन्ही टप्प्यातील मतदानात घट झाली आहे. गेल्या वेळी पहिल्या टप्प्यात ६४ % तर दुसऱ्या टप्प्यात सरासरी ६२.३८ मतदान झाले हाेते.

दुसऱ्या टप्प्यातील दहा लोकसभा मतदारसंघात सायंकाळी पाच वाजेपर्यंत पुढीलप्रमाणे मतदान झाले.

मतदारसंघ मतदान
बुलडाणा 57.09
अकोला 54.45
अमरावती 55.43
हिंगोली 60.69
नांदेड 60.88
परभणी 58.50
बीड 58.44
उस्मानाबाद 57.04
लातूर 57.94
सोलापूर 51.98

X
COMMENT