Home | Jeevan Mantra | Jyotish | Rashi Nidan | वृषभ आजचे राशिभविष्य 28 Aug 2018, Aajche Vrishabha Rashi Bhavishya | Today Taurus Horoscope in Marathi - 28 Aug 2018

28 Aug 2018, वृषभ राशिफळ : जाणून घ्या, वृषभ राशीच्या लोकांसाठी कसा राहील आजचा दिवस

रिलिजन डेस्क | Update - Aug 28, 2018, 08:10 AM IST

Taurus Horoscope (11 ऑगस्ट 2018, Aajche Kark Rashi Bhavishya): जाणून घ्या, आज तुम्हाला कोणत्या आव्हानांना सामोरे जागे लागू शकते आणि कोणत्या गोष्टींमध्ये सावध राहावे

 • वृषभ आजचे राशिभविष्य 28 Aug 2018, Aajche Vrishabha Rashi Bhavishya | Today Taurus Horoscope in Marathi - 28 Aug 2018
  28 Aug 2018, वृष राशिफळ (Aajche Vrishabh Rashi Bhavishya): वृषभ राशीचे लोक व्यावहारिक, विश्वासू आणि उदार स्वभावाचे असतात. यासोबतच तुम्ही कलात्मक विचारांचे आणि स्थिर स्वभावाचे प्रामाणिक व्यक्ती आहात. या गुणांमुळे आज तुम्ही काही लोकांना प्रभावित करू शकाल. नोकरी, बिझनेस आणि करिअर क्षेत्रामध्ये कसा राहील वृषभ राशीच्या लोकांचा दिवस सविस्तर वाचा, दिव्य मराठीच्या या पेजवर.


  पॉझिटिव्ह - भावनात्मक चढ-उतार होतील. आपला व्यवहार लवचिक ठेवा आणि योग्य वेळ येण्याची वाट पाहा. लोक तुमचे लक्ष भरकटवण्याचा प्रयत्न करू शकतात. तुम्ही तुमचे म्हणणे स्पष्टरीत्या मांडू शकाल आणि यात तुम्हाला यशही मिळू शकते. असे एखादे काम करा, ज्यात एकदाच अनेकांचा फायदा होईल. घर-परिवार आणि जीवनसाथीशी पूर्वीपेक्षा चांगले संबंध बनतील. दैनंदिन कामे वेळेवर होऊ शकतात. तणावपूर्ण परिस्थितीतही तुम्ही संतुलन कायम ठेवण्यात यशस्वी व्हाल.


  निगेटिव्ह - काही खासगी अडचणींत तुम्ही अडकू शकतात. घर आणि ऑफिसमध्ये ताळमेळ राहणार नाही. अप्रिय विचार येऊ शकतात. अशा गोष्टी कुणालाही शेअर करू नका. एखादे काम बिघडल्यास निराशा होऊ नका. खर्च आणि आळस जास्त राहील. कुटुंबात थोडीबहुत कुरबुर होऊ शकते. वैचारिक आणि भावनात्मक चढउतार होत राहतील.


  काय करावे - अंकुरित मूग आणि हिरव्या भाज्या खा.


  लव्ह - पती-पत्नीत सामंजस्य राहील. रोमान्ससाठी वेळ काढू शकणार नाहीत.


  करिअर - एखाद्याकडून कर्जही घ्यावे लागू शकते. वायफळ खर्च टाळा. जोखमीचे कामे करू नका. धीर धरा. अभ्यासावर लक्ष केंद्रित करा. स्पर्धेत यश मिळेल.


  हेल्थ - आरोग्यात पूर्वीपेक्षा सुधारणा होऊ शकते.

Trending