Home | Jeevan Mantra | Jyotish | Rashi Nidan | वृषभ आजचे राशिभविष्य 30 Aug 2018, Aajche Vrishabha Rashi Bhavishya | Today Taurus Horoscope in Marathi - 30 Aug 2018

वृषभ राशिफळ, 30 Aug 2018: जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कशी राहील सूर्य-चंद्राची स्थिती

रिलिजन डेस्क | Update - Aug 30, 2018, 07:59 AM IST

Taurus Horoscope (Kark Rashi Bhavishya Today | वृषभ राशिफळ, 11 ऑगस्ट 2018): येथे जाणून घ्या, आज 11 ऑगस्ट 2018 ला तुमच्या जीवनात काय पॉझिटिव्ह, काय निगेटिव्ह राहील

 • वृषभ आजचे राशिभविष्य 30 Aug 2018, Aajche Vrishabha Rashi Bhavishya | Today Taurus Horoscope in Marathi - 30 Aug 2018
  वृष राशिफळ, (30 Aug 2018, Aajche Vrishabh Rashi Bhavishya): वृषभ राशीचे लोक आज आळशीपणामुळे काही कामे अपूर्ण सोडू शकतात. आज तुम्हाला तुमच्या हट्टी स्वभावावर नियंत्रण ठेवावे लागेल. कोणत्याही कामामध्ये पक्षपातीपणा करू नये. आज 30 Aug 2018 तुमच्या जीवनात काय पॉझिटिव्ह आणि काय निगेटिव्ह राहील, वाचा सविस्तर दिव्य मराठीच्या या पेजवर.


  पॉझिटिव्ह - मदत वा सल्ला घेण्यासाठी काही जण तुम्हाला संपर्क करतील. मित्र आणि भावांशी तुमचे चांगले संबंध राहतील. चंद्र गोचर कुंडलीच्या लाभ स्थानात आहे. कोण काय विचार करत आहे, हे तुम्हाला कळून येईल. रोमान्सच्या बाबतीत हा काळ चांगला राहील. बहुतांश बाबतीत दिवस उत्तम आहे. तुमचे कौतुक होईल. एखादा पुरस्कारही तुम्हाला मिळू शकतो. आज केलेल्या कामांचा फायदाही तुम्हाला मिळेल. वेळ तुमच्या बाजूने असल्याने तुम्ही खुश असाल. जास्त मेहनत करून थोडा धनलाभही पदरात पाडून घ्याल.


  निगेटिव्ह - विचार न करता बोलणे तुमच्यासाठी अडचणीचे ठरणार आहे. एक विचित्र परिस्थिती तुमच्यासोबत तयार होईल. पोटात एखादी बाब असेल आणि ओठात दुसरेच येईल. तुमच्या जवळचे तुमच्यापासून काहीतरी गुपित ठेवतील. तुमची प्रकृती थोडी कमजोर होऊ शकते. आळस राहील. वाहने सांभाळून चालवा.


  काय करावे - भिन्न लिंगी व्यक्तीला डियो किंवा परफ्यूम गिफ्ट करा.

  लव्ह - जीवनसाथी वा लव्ह पार्टनरशी विनाकारण वाद होईल. प्रेमा संबंधांत दुरावा वाढेल.


  करिअर- नोकरदार आणि बिझनेस करणाऱ्यांसाठी चांगला दिवस आहे. एखाद्या छोट्या कामाचा तुम्हाला मोठा फायदाही मिळू शकतो. विद्यार्थ्यांसाठी सामान्य दिवस राहील. परंतु तुम्हाला जास्त मेहनत करावीच लागेल. मनात दिवसभर संभ्रमावस्था असेल.


  हेल्थ - आरोग्य चढउतार होईल. जुने आजार पुन्हा डोके वर काढतील.

Trending