आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

व्हीव्हीआयपी हेलिकॉप्टर घोटाळा; दलाल मिशेल भारताच्या ताब्यात, व्यवहारात २२५ कोटींची दलाली घेतल्याचा आरोप

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

दुबई - ३,६०० कोटींच्या ऑगस्टा-वेस्टलँड व्हीव्हीआयपी हेलिकॉप्टर घोटाळ्यातील दलाल ब्रिटिश नागरिक क्रिश्चियन मिशेल (५७) याला संयुक्त अरब अमिरातने (यूएई) भारताकडे सोपवले. सीबीआय, रॉ आणि परराष्ट्र मंत्रालयाचे अधिकारी गल्फ स्ट्रीमच्या जेट विमानाने त्याला भारतात घेऊन आले. दिल्लीत इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर रात्री १०.३५ वाजता पोहचताच सीबीआयने त्याला ताब्यात घेतले. व्हीव्हीआयपी हेलिकॉप्टर व्यवहारात मिशल याने २२५ कोटींची दलाली घेतल्याचा आरोप आहे. या प्रकरणात हवाईदलाचे माजी प्रमुख एस. पी. त्यागी हे पण आरोपी आहेत. 


अजित डोभाल यांचे मार्गदर्शन : राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांच्या मार्गदर्शनाखाली केलेल्या कार्यवाहीत मिशेल यास भारताच्या ताब्यात घेण्यात यश आले. सीबीआय अधिकाऱ्यांनी कार्यकारी संचालक एम. नागेश्वर राव यांच्या नेतृत्वाखाली ही मोहीम फत्ते केली. सीबीआयचे संयुक्त संचालक ए. साई मनोहर हे प्रत्यार्पणाची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी दुबईला गेले होते. परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज याही सध्या अमिरातीत आहेत. दुबई कोर्टाने सप्टेंबरमध्ये क्रिश्चियन मिशेल याच्या प्रत्यार्पणाचे आदेश दिले होते. 

 

प्रत्यार्पणामुळे वाढल्या गांधी कुटुंबीयांच्या अडचणी 
क्रिश्चियन मिशेलला भारतात आणल्यानंतर काँग्रेसचे नेतृत्व करणाऱ्या गांधी कुटुंबीयांच्या अडचणीत वाढ होणार आहे. भाजपचे प्रवक्ते जी.व्ही.एल. नरसिंहा राव म्हणाले की, भ्रष्टाचाराविरुद्ध मोदी सरकारमध्ये असलेले गांभीर्य पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. यात आता मूळ लाचखोर लोकांची नावे उजेडात येणे गरजेचे आहे. 

बातम्या आणखी आहेत...