आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • VVPAT: Election Commission Rejects Opposition's Demand On Changes To VVPAT Counting Process

ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट मशीनची मतं मॅच करण्याची मागणी निवडणूक आयोगाने फेटाळून लावली, 22 विरोधी पक्षांची केली होती मागणी

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅटच्या मुद्द्यावरून विरोधी पक्षांच्या नेत्यांनी बुधवारी निवडणूक आयोगाची भेट घेतली. त्यांनी आयोगाकडे मतदानापूर्वी व्हीव्हीपॅट मशीनच्या चिठ्या मॅच करून पाहाव्यात ही मागणी केली होती, पण आयोगाने त्यांची ही मागणी फेटाळून लावली आहे.


या आधी मंगळवारी काँग्रेस, तेदेपा, तृणमूल आणि बसपासहित 22 विरोधी पक्षांनी निवडणूक आयोगाची भेट घेतली होती. विरोधी नेत्यांनी आयोगाकडे मॅच करण्यासाठी विनंती अर्ज सोपवला होता.


जर काही गडबड आढळली, तर त्या परिसरातील सगळे व्हीव्हीपॅट मॅच करून पाहावे
गुलाम नबी आजाद मंगळवारी म्हणाले- विरोधी पक्षांनी आपल्या विनंती अर्जात आयोगाला विनंती केली आहे की, जर एकाही विधानसभा परिसरातील 5 पोलिंग स्टेशन्सपैकी एकामध्येही गडबडी झाली, तर त्या क्षेत्रातील सगळ्या व्हीव्हीपॅट मॅच करून पाहाव्यात. 


सुप्रीम कोर्टाने 100% व्हीव्हीपॅट मॅच करण्याची मागणी फेटाळून लावली
सुप्रीम कोर्टाने मंगळवारी 100% ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट मॅच करण्याची मागणी फेटाळून लावली. कोर्टाने स्पष्ट केले की, लोकप्रतिनिधीं आणि निवडणुकींच्या मध्ये आम्ही येणार नाहीत. ही याचिका काही टेक्नोक्रेट्सने दाखल केली होती. जस्टिस अरुण मिश्रा आणि जस्टिस एमआर शाह यांच्या वेकेशन बँचने स्पष्ट केले की- या प्रकरणात सीजेआयने आधीच सुनावणी केली आहे. आता दोन न्यायाधिशांच्या बँचकडून काय अपेक्षा करत आहात. आम्ही या प्रकरणाची लगेच सुनावणी करणार नाहीयेत. आम्ही सीजेआयच्या आदेशाचे उल्लघंन करणार नाहीत. 7 मे रोजी सीजेआयच्या बँचने 21 विरोधी पक्षांची 50 % व्हीव्हीपॅट मॅच करण्याची मागणी फेटाळून लावली होती.

बातम्या आणखी आहेत...