आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

व्ही.व्ही.एस लक्ष्मणने केला मोठा खुलासा - कोहली आणि कुंबळे यांच्यातील वादाचे सांगितले कारण

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


स्पोर्ट डेस्क : भारताचा कसोटीपटू आणि महान फलंदाज व्ही.व्ही.एस लक्ष्मण सध्या आपली ऑटो बायोग्राफी '281 अॅण्ड बियाँड' चे प्रमोशन करण्यात व्यस्त आहे. यादरम्यान त्याने भारताचा कर्णधार आणि फलंदाज विराट कोहली आणि माजी फिरकीपटू गुगली स्पेशालिस्ट अनिल कुंबळे यांच्या भांडणाविषयी खुलासा केला. समितीने अनिल कुंबळेला समजावण्याचा खूप प्रयत्न केला पण त्यांना स्वतःलाच प्रशिक्षकपद सोडायचे होते असे लक्ष्मणने यावेळी सांगितले.

 

या विषयी बोलताना लक्ष्मणने बोलताना सांगितले की, कुंबळेच्या राजीनाम्यासाठी कोहलीने कोणतीही सीमा ओलांडली नाही. समितीने अनिल कुंबळेला प्रशिक्षकपदी नियुक्त करण्याचा निर्णय घेतला होता. यासाठी त्यांनी कुंबळेकडे तशी विनंती सुद्धा केली होती. पण कुंबळेच स्वतः या पदावर राहण्याची इच्छा नव्हती. यामुळे त्यांनी प्रशिक्षकपद सोडण्याचा निर्णय घेतला. यामुळे भारतीय संघाला काही काळासाठी वाईट परिस्थितीला सामोरे जावे लागले होते. 

 

 

अनिल कुंबळेची नियुक्ती करणाऱ्या समितीमध्ये सौरव गांगुली, सचिन तेंडूलकरसोबत व्ही.व्ही.एस लक्ष्मणचा समावेश होता. पण नंतर कोहलीसोबतच्या भांडणामुळे कुंबळेंनी आपला राजीनामा दिला होता. याविषयी बोलताना ते पुढे म्हणाले की, कोहली चॅम्पीयन्स ट्रॉफीदरम्यान चुकीच्या कारणांमुळे चर्चेत आला होता. कुंबळे यांनीच प्रशिक्षकपदी रहावे असे समितीला वाटत होते. पण दुर्दैवाने विराट कोहली आणि अनिल कुंबळे यांनी एकत्रिक काम केले नसल्याची खंत लक्ष्मणने यावेळी व्यक्त केली. 

बातम्या आणखी आहेत...