आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'व्योममित्रा' गगनयानासोबत जाणार अंतराळात, मानवी शरीराच्या हालचालींचा अहवाल पाठवणार

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बंगळुरू : भारतीय अंतराळ संशोधन संस्थेची मानवरहित अंतराळ मोहीम गगनयानात पाठवण्यात येणारी ह्यूमनॉइड व्योममित्रा' बुधवारी इस्रोच्या वतीने बंगळुरूत जगासमोर सादर करण्यात आले. मानवयुक्त अंतराळ मोहीम गगनयान २०२२ मध्ये पाठवण्यात येणार आहे. त्याच्या उड्डाणाच्या आधी इस्रो व्योममित्रा'ला अंतराळात पाठवणार असून तेथे मानवी शरीराच्या हालचालींचा अभ्यास करणार आहे.

व्योममित्रा'बाबत सांगताना इस्राेचे शास्त्रज्ञ सॅम दयाल यांनी सांगितले की, ही हाफ ह्यूमनाॅइड रोबोट अंतराळातून इस्रोला अहवाल पाठवेल. तिचे पाय नसल्याने तिला हाफ ह्यूमनॉइड म्हटले जात आहे. ती विशेष प्रकारची रोबोट आहे, जी बोलेल आणि लोकांच्या प्रश्नांची उत्तरे देईल. लोकांना ओळखूही शकते. व्योममित्रा' अंतराळवीरांच्या हालचालींची नक्कल करू शकते. दयाल यांनी सांगितले की, ती केवळ पुढे किंवा बाजूला वाकू शकते. व्योममित्रा'चा शोध इस्रोने लावला आहे.

'व्योममित्रा'ने सगळ्यांना हाय म्हणत करून दिली स्वत:ची ओळख

इस्रोच्या मानवरहित गगनयानात जाणारी व्योममित्रा बंगळुरूत सादर करण्यात आली. या वेळी हाय मी हाफ ह्यूमनॉइडचा (मानवी) पहिला नमुना आहे असे म्हणून व्योममित्राने उपस्थितांना अभिवादन केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या घोषणेनुसार, इस्रो २०२२ च्या मुदतीत भारताच्या पहिल्या मानवयुक्त अंतराळ मोहिमेवर गगनयान पाठवण्याची तयारी करत आहे. भारतीयांना (अंतराळवीरांना) अंतराळात पाठवून त्यांना परत सुखरूप परत आणणे या मोहिमेचे उद्दिष्ट आहे. मोहिमेपूर्वी भारत दोन मानवरहित गगनयानांची चाचणी करेल. पहिले यान या वर्षी डिसेंबरपर्यंत तर दुसरे यान पुढील वर्षी अंतराळात पाठवले जाण्याची शक्यता आहे.

निवड केलेले चार लोक या महिन्यात प्रशिक्षणासाठी रशियात जाणार

इस्रो प्रमुख सिवन यांनी सांगितले, अंतराळ मोहिमेसाठी जानेवारीच्या शेवटी निवड झालेल्या ४ अंतराळवीरांना प्रशिक्षणासाठी रशियाला पाठवले जाईल. ११ महिने प्रशिक्षण दिले जाईल. ते म्हणाले की, १९८४ ला राकेश शर्मा रशियाच्या गगनयानात अंतराळात गेले होते. या वेळी आपले अंतराळवीर भारताच्या गगनयानातून अंतराळात जातील. हेे अभियान २०२२ मध्ये सुरू होईल. यात ३ क्रू मेंबर असतील. या अभियानासाठी इस्रो कोणत्याही महिलेला पाठवणार नसल्याने, महिलेचा चेहरा असलेला ह्यूनॉइड तयार करण्यात आले आहे. सूत्रांनुसार, गगनयान देशातील सर्वात शक्तिशाली जीएसएलव्ही मार्क-३ मधून लाँच केले जाईल.
 

बातम्या आणखी आहेत...