आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मारुती आणतेय नवी 7 सीटर कार, 3 व्हेरीएंटमध्ये होऊ शकते लाँच, रिपोर्ट्सनुसार एवढी असेल प्रत्येक व्हेरिएंटची किंमत

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अॅटो डेस्क - मारुती सुझुकी 7 सीटर वॅगनआर लाँच करणार असल्याच्या चर्चा अनेक दिवसांपासून सुरू आहेत. आता अनेक मीडिया रिपोर्ट्समध्येदेखिल ही बातमी खरी असल्याचे म्हटले आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार न्यू वॅगनआर मारुतीच्या ओमनीला रिप्लेस करेल. कंपनीने सांगितले की, 2020 पासून भारतात न्यू व्हेइकल सेफ्टी असेसमेंट प्रोग्राम लागू होणार आहे. त्यामुळेच ही कार बंद करावी लागेल. कारण ही कार सेफ्टी नॉर्म्सनुसार तयार केलेली नाही. 


7 सीटर वॅगनआर 
कंपनीशी संबंधित सुत्रांच्या मते, न्यू वॅगनआर जुन्या कारपेक्षा पूर्णपणे वेगळी असेल. पण समोरून तिचा लूक जुन्या वॅगनआर सारखा दिसेल. 7 सीटर कारमध्ये जास्त स्पेस असेल. त्यात समोर 2, मधे 3 आणि मागे 2 सीटसाठी जागा असेल. यात 3 सिलिंडरचे 1200cc चे पेट्रोल इंजीन असेल. पॉवरचा विचार करता 84bhp आणि 115Nm टॉर्क जनरेट करेल. ही कार टेस्टींग दरम्यान दिसल्याचेही सांगण्यात येते. 


पेट्रोल आणि CNG व्हेरीएंट 
कंपनी नव्या वॅगनआरबरोबर CNG चा पर्यायही देऊ शकते. 3 मॉडेल्समध्ये लाँच होणारी ही कार R बेस, R टॉप आणि R CNG नावानेच विकली जाईल. या कारची दिल्ली एक्स-शोरूम किंमत 5.2 लाखांपासून सुरू होईल.  R टॉप की 6.5 लाख रुपए आणि R CNG ची किंमत 6.3 लाख असू शकते. याच 5 स्पीड मॅन्युअल आणि अॅटो ट्रान्समिशन (AMT) दोन्ही पर्याय असतील. 

 

इंटेरियर आणि फिचर्स 
वॅगनआर 7 सीटर लिमिटेड एडिशनमध्ये न्यू बॉडी ग्राफिक्स असतील. त्यात की-लेस एंट्रीसह सेंट्रल लॉकिंग, सिक्युरिटी अलार्म, ड्युअल टोन डॅशबोर्ड, ब्लूटूथसह डबल डिन स्टीरिओ, प्रिमियम सीट फॅब्रिकसह रियर पॉवर विंडो मिळेल. 

बातम्या आणखी आहेत...