आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सरकारसाठी ४ दिवस थांबा! राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचे सूचक वक्तव्य

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - महाराष्ट्रात शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादीचे सरकार स्थापन होण्यासाठी ४ दिवसांचा अवधी लागेल, असे संकेत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील यांनी शनिवारी दिले. आम्ही सरकार स्थापनेबाबत कोणतीही डेडलाइन निश्चित केलेली नाही, सध्या दोन्ही काँग्रेसच्या हायकमांडची चर्चा सुरू असल्याचे पाटील यांनी स्पष्ट केले. दोन्ही काँग्रेसला शिवसेनेसोबत जाण्यात काहीच अडचण नाही. राज्यात नवीन सरकार स्थापन करताना तिन्ही पक्षांना कोणते मुद्दे मान्य होतील, याची चाचपणी केली आहे. त्याचा अहवाल वरिष्ठांना दिला आहे. प्रथम मंत्र्यांची संख्या निश्चित होईल. यानंतरच खातेवाटपाची प्रक्रिया पार पडेल, असे पाटील म्हणाले.पवार-सोनिया भेट लांबणीवर
 
पुण्यात रविवारी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पक्षाच्या कोअर कमिटीची बैठक बोलावल्याची माहिती पक्षाचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी दिली. यामुळे दिल्लीत काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधींसोबतची त्यांची भेट लांबणीवर पडली आहे.