आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराटोकियो - जगभरात लोकप्रिय ठरलेला कार्टून मिकी माऊस आता ९० वर्षांचा झाला आहे. इतक्या वर्षांनंतरही मिकीची प्रचंड क्रेझ आहे. वाढदिवसानिमित्त मिकीला भेटून शुभेच्छा देण्यासाठी चाहत्यांना तासन््तास रांगेत प्रतीक्षा करावी लागत आहे. जपानच्या डिस्नेलँडमध्ये मिकी माऊसला भेटण्याची वेळ ६६० मिनिटे म्हणजेच ११ तास दाखवली जात आहे.
१८ नोव्हेंबरला मिकीचा वाढदिवस होता. त्या दिवशी रात्री डिस्नेलँडमध्ये मोठी रांग लागली होती. डिस्नेलँडमधील मिकीच्या घरात जाण्यासाठी त्याला भेटण्यासाठी चाहत्यांची एकच गर्दी झाली. इतर कार्टून कॅरेक्टरला भेटण्यासाठीची प्रतीक्षा वेळ १५ ते २० मिनिटांची होती. डिस्नेलँडच्या बाहेर एक फलक लावण्यात आला होता. यावर विविध कार्टून कॅरेक्टरला भेटण्यासाठीची प्रतीक्षा वेळ नोंदवली गेली होती. टोकियो डिस्नेलँडचे अधिकारी ताकेशी नेमोटो म्हणाले की, “मिकीच्या वाढदिवसाला एक दिवस आधी सायंकाळपर्यंत प्रतीक्षा वेळ १८० मिनिटांपर्यंत पोहोचली होती. या वेळेत थोडी वाढ होईल, असे वाटले होते. पण पुढील दिवशी सकाळी ९ वाजेपर्यंत प्रतीक्षा वेळ ६६० मिनिटांपर्यंत पोहोचली. मिकीच्या घरात जाण्यासाठी मोठ्या रांगा लागल्या होत्या. आतापर्यंतच्या इतिहासात एवढी मोठी रांग मी पहिल्यांदाच पाहिली.’
डोनाल्ड आणि टॉम-जेरीसारखे कार्टून कॅरेक्टरही मिकीनंतर आले
- १८ नोव्हेंबर १९२८ रोजी पहिल्यांदा मिकीचे कार्टून स्टीमबोट विली भेटीला
- ९० वर्षांचे मिकी माऊस जगातील सर्वात वयस्कर कार्टून कॅरेक्टर. फेलिक्स-द कॅट हे पहिले तर बोन्जो-द डॉग हे दुसरे कार्टून कॅरेक्टर आहे.
- डोनाल्ड डकचे कॅरेक्टर १९३४, टॉम अँड जेरी कार्टून १९४० मध्ये लोकांसमोर
- कार्टून मालिकेच्या बाबतीत मिकी माऊसचा पहिला कार्टून एपिसोड स्टीमबोट विली हे जगातील नववे सर्वात जुने कार्टून आहे.
- १९०८ मध्ये आलेली फँटासमागोरी ही जगातील सर्वात जुनी कार्टून मालिका म्हणून ओळखली जाते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.