Home | Khabrein Jara Hat Ke | Waitress with no symptoms of pregnancy gave birth in the bath by herself

अंघोळ करताना अचानक पोटात दुखले आणि बाथरूममध्येच महिलेने दिला मुलीला जन्म, तिला माहितदेखील नव्हते की, ती गरोदर आहे...

दिव्य मराठी वेब टीम | Update - Apr 17, 2019, 02:29 PM IST

मुलीने सांगितली प्रेग्नंसीची गोष्ट, बॉयफ्रेंडलाही बसला नाही विश्वास

 • Waitress with no symptoms of pregnancy gave birth in the bath by herself

  लंडन- इंग्लँडमध्ये एका महिलेने घराच्या बाथरूममध्ये अंघोळ करताना अचानक मुलीला जन्म दिला. ती म्हणाली, तिला या गरोरपणाबद्दल काहीच माहिती नव्हती. तिचे पोटही कधी वाढले नाही आणि तिला आपल्या शरिरात काही बदल झाल्याचेही जाणवले नाही. त्यासोबत ती नेहमी गर्भनिरोधक गोळ्या घेत होती आणि तिची मासिक पाळीही बंद झाली नाही. या सगळ्यामुळे तिला आपण गरोदर असल्याचे माहित नव्हते. इतकच काय तर तिच्या बॉयफ्रेडलाही विश्वास बसला नाही की, ती त्याचीच मुलगी आहे.


  डिलीव्हरीवेळेस घरात एकटी होती

  - ही स्टोरी ईस्ट लंडनच्या बो परिसरात राहणाऱ्या चार्लोट डुबार्ट(24) आणि तिचा बॉयफ्रेंड मिगेल एंजेल(28) ची आहे. त्यांची ओळख तीन वर्षांपूर्वी एका डेटींग अॅपवरून झाली. चार्लोट ग्रॅजुएट आहे आणि वेट्रेसची नोकरी करते. तिने याच वर्षी 29 जानेवारीला आपल्या घरातील बाथरूममध्ये मुलगी एलियासला जन्म दिला.
  - चार्लोटने सांगितले की, तिला या प्रेग्नंसीबद्दल काहीच माहित नव्हते. त्यामुळे अंघोळ करताना अचानक तिच्या पोटातून बाळ बाहेर आल्याने तिला धक्का बसला. त्यानंतर तिने कात्रीने मुलाच्या नाळेला कापले आणि त्या बाळाला आपल्या बॉयफ्रेंडला दाखवले.
  - ती म्हणाली की, माझ्या शरीरात प्रेग्नंसीचे काहीच लक्षण नव्हते. माझ्यात इतकाच बदल झाला होता की, मला गोड खाण्याची सवय लागली होती आणि माझे वजनदेखील 5 किलोने वाढले होते. कधी-कधी पोटात दुखत होते, पण गरोदर असल्याची काही लक्षणे नव्हती.
  - डिलीवह्रीच्या वेळी ती घरात एकटीच होती आणि जेव्हा तिला बाळ झाले, तेव्हा तिने आपल्या बॉयफ्रेंडला सांगितले. त्याला विश्वासच बसत नव्हता की, तो एका मुलीचा बाप झाला आहे. सध्या ते कपल खूश आहे.

 • Waitress with no symptoms of pregnancy gave birth in the bath by herself
 • Waitress with no symptoms of pregnancy gave birth in the bath by herself

Trending