आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कर्ज घेतले नाही त्यांनाही माफी, कर्जमाफी योजनेत महाघोटाळा; अर्थसंकल्पावर चर्चेत विरोधकांकडून घणाघाती टीका

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • औरंगाबादचे क्रीडा विद्यापीठ पुण्याला का नेले : फडणवीस
  • वीज दरवाढीमुळे सामान्य ग्राहकाला भुर्दंड : दरेकर

मुंबई - सरसकट कर्जमाफी, सातबारा कोरा अशी आश्वासने देत सत्तेवर आलेल्यांनी सरसकट कर्जमाफी तर केली नाहीच तसेच दिलेल्या वचनाप्रमाणे सात-बाराही कोरा केला जात नाही. सरकार प्रोत्साहनपर रक्कम ज्याने तीन वर्षे नियमित पैसे भरले त्यांनाच देत आहे. कर्जमाफीच्या यादीत नाव नसल्याने शेतकरी आत्महत्या करतोय तर दुसरीकडे ज्यांनी कर्जच घेतले नाही, त्यांनाही कर्जमाफी दिली जात असून हा महाघोटाळा असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी विधानसभेत केला.
राज्याच्या अर्थसंकल्पावर बुधवारी विधानसभेत अर्थमंत्री अजित पवार यांनी नियम ५७ अन्वये चर्चेचा प्रस्ताव मांडला. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी चर्चा सुरु केली.  ते म्हणाले, अर्थसंकल्पात विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रावर झालेला आहे तर शिवसेनेला कोकणानेही कायम भरभरून दिले, पण, कोकणही पूर्णत: दुर्लक्षित करण्यात आला.हा संयुक्त महाराष्ट्राचा अर्थसंकल्प आहे का असा प्रश्न उपस्थित करुन मराठवाड्यातील वॉटर ग्रीडसाठी २००  कोटी आणि वरळीतील पर्यटन केंद्रासाठी १०००   कोटी, हा या सरकारचा प्राधान्यक्रम आहे. औरंगाबादचे क्रीडा विद्यापीठ पुण्याला नेले. तेथे करायचे होते, तर दुसरे करायचे. पण औरंगाबादचे का हिसकावून घेतले असे फडणवीस म्हणाले. इतरांचे आकारमान का कमी ?


पुण्याच्या जिल्हा योजनांचे आकारमान २३  टक्क्यांनी वाढवले आणि नागपूर विभागाचे आकारमान १७  टक्क्यांनी कमी केले. अमरावती विभागाच्या जिल्हा योजनांचे आकारमान केवळ ३ टक्के? आकारमान वाढवण्यास आमची हरकत नाही, पण, इतरांचे कमी का करता? विदर्भ आणि मराठवाड्यातील सिंचन प्रकल्प जोवर पूर्ण करीत नाही, तोवर शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबणार नाहीत. शेतकऱ्यांना पाणी देणे, हाच शेतीच्या समस्येवरचा शाश्वत उपाय आहे. 

अर्थसंकल्पात राज्यपालांच्या अभिभाषणाला केराची टोपली


महाराष्ट्राचा अर्थसंकल्प हा पूर्णपणे गोलमाल, दिशाहीन आणि सामान्य जनतेच्या तोंडाला पाने पुसणारा आहे. राज्यपालांचे अभिभाषण राज्याची आगामी दिशा दर्शवणारा असतो, परंतू अर्थसंकल्पामध्ये मात्र राज्यपालांच्या अभिभाषणाला केराची टोपली दाखविण्यात आली आहे, अशी टीका विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी बुधवारी विधान परिषदेत केली.
राज्याच्या अर्थसंकल्पावरील चर्चेची सुरूवात केल्यानंतर ते बोलत होते. अर्थसंकल्पात वीज दरवाढीची तरतूद केल्याने सामान्य ग्राहकांवर भुर्दंड पडणार आहे. राज्यपालांच्या अभिभाषणामध्ये इंदू मिलमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर याचे आंतरराष्ट्रीय स्मारक तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या समुद्रातील शिव स्मारकाचा उल्लेख आहे. मात्र अर्थसंकल्पामध्ये महाविकास आघाडी सरकारला याचा विसर पडला आहे. अनुसूचित जाती-जमाती आणि आदिवासी विकास विभागासाठी कोणत्याही नवीन योजना सरकारला देता आल्या नाहीत. ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनी वीज ग्राहकांसाठी १०० युनिटपर्यंतची वीज मोफत देऊ अशी घोषणा केली होती. मात्र अर्थसंकल्पात यासाठी कोणतीही तरतूद दिसत नाही.अशी टीका दरेकर यांनी केली.विरोधकांची मुस्कटदाबी 


दरेकर यांचे भाषण सुरू असताना त्याचे थेट प्रक्षेपण होत नसल्याची बाब भाजपाचे सदस्य सुजितसिंह ठाकूर यांनी सभापतींच्या निदर्शनास आणून दिली. त्यावेळी  विरोधकांचा मुस्कटदाबी करण्याचा हा प्रकार आहे असा आरोप करुन दरेकर म्हणाले, विरोधी पक्षनेत्यांना दिलेले अधिकृत निवासस्थान काढून घ्यायचे, सभागृहात बोलू द्यायचे नाही तसेच विरोधी पक्षनेत्यांचे खाजगी सचिव यांच्या नियुक्तीमध्ये अडथळे आणले जात आहेत.

बातम्या आणखी आहेत...