Home | Maharashtra | Pune | Wakad police arrested criminal who made tiktok video in pune

कोयत्यासारखे धारदार हत्यार घेऊन गुंडाचा TikTok व्हिडीओ व्हायरल, पुण्यातील वाकड मधील घटना

दिव्य मराठी वेब टीम | Update - May 14, 2019, 12:11 PM IST

त्याने "वाढीव दिसतंय राव…" या लावणीवर व्हिडीओ तयार केला

  • Wakad police arrested criminal who made tiktok video in pune

    पुणे- मागील काही दिवसांपासून कुख्यात गुंडांचे Tik Tok व्हिडीओ व्हायरल होताना दिसत आहेत. नागपूर आणि औरंगाबाद या दोन ठिकाणी गुन्हेगारांचे Tik Tok व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर आता पुण्यातील एका गुन्हेगारानेही टीक टॉक व्हिडीओ तयार केला आहे. दीपक आबा दाखले असे या गुंडाचे नाव असून वाकड पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे.

    पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दीपकने परिसरात दहशत पसरवण्यासाठी टीक टॉकवरून व्हिडीओ तयार केला. यात त्याने "वाढीव दिसतंय राव…" या लावणीवर व्हिडीओ तयार केला आहे. विशेष म्हणजे या व्हिडीओत दहशत निर्माण करण्यासाठी दीपकने हातात कोयत्यासारखे धारदार शस्त्र बाळगले आहे.


    गेल्या काही दिवसांपासून पुण्यातील पिंपरी परिसरात हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. त्याच्या या व्हिडीओमुळे परिसरात प्रचंड प्रमाणात दहशत निर्माण झाली आहे. वाकड पोलिसांच्या हाती हा व्हिडीओ लागताच त्यांनी दीपकवर गुन्हा दाखल करून सापळा रचून त्याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून संबंधित शस्त्र जप्त करण्यात आले आहे.


    दरम्यान काही दिवसांपूर्वी नागपूर आणि औरंगाबादमधील कुख्यात गुंड TikTok व्हिडीओ बनवत असल्याचे प्रकार उघडकीस आले आहे. गुन्हेगारांनी बनवलेले हे TikTok व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल होत आहे. दिवसेंदिवस गुन्हेगारांच्या या टीक टॉक व्हिडीओमुळे नागरिकांमध्ये दहशत पसरत आहे.

Trending