आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उठा आणि दाखवुन द्या जगाला स्त्री शक्ती

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
8 मार्च म्हणजेच 'जागतिक महिला दिन' म्हणजेच महिला मुक्ती दिन. पण हा एकच दिवस का? या एकाच दिवशी महिलांनी स्वतंत्र्य राहावे का?
आज जर गर्भातील मुलगीच स्वतंत्र्य व सुरक्षित नसेल तर मग इतर महिला-मुलींचे काय? त्यांना कसे सुरक्षीत समजावे? मुलाप्रमाणेच मुलगीही श्रेष्ठ आहे.
मुलगा वारस आहे तर मुलगी परिस आहे.
बेटा वंश है, तो तो बेटी अंश है
बेटा आन है, तो बेटी शान है
बेटा मान है, तो बेटी अभिमान है
बेटा संस्कार है तो बेटी संस्कृती है
बेटा आग है तो बेटी पाणी है
बेटा दवा है तो बेटी दूवा है
असे असतानाही मुले बंध मुक्त आहेत, मुली आजही बंधनांमध्ये वावरताना दिसतात. बंधने ही मुलींनाच का, असा प्रश्न मग माझ्या सारख्या मुलींना पडतो. हा प्रश्न जर आम्हा मुलींना पडत असेल तर मग कोणत्या स्वातंत्र्यात आम्ही जगत आहोत? स्वातंत्र्यानंतर कोणती सुरक्षितता आम्हाला मिळाली आहे? असे एक नव्हे असंख्य प्रश्न फेर धरुन माझ्या भोवती उभे असतात.
मुलींवर ही बंधने कोणी घातली? त्यांना असुरक्षिततेची जाणीव कोण करून देतो, तर या प्रश्नाचे उत्तर असते आपण आणि आपल्या आसपासचे वातावरण, पर्यायाने समाज. आपणच आपल्या मनाला समजावत असतो, की मी हे काम करू शकणार नाही. का अनेक पिढ्यांपासून चालत आलेली परंपरा आहे म्हणून.

पण, दुस-या बाजूला जर या देशाला एक महिला साभाळू शकते हे आपण पाहिले आहे. तर मग समाजाने आणि तिनेही स्वतःला दुबळे का म्हणून समजावे. शहरातील स्त्रिया पुरुषांच्या बरोबरीने काम करतात त्या स्वबळावर राहू शकतात. पण गावात अजुनही काही स्त्रियाना स्वतंत्र आणि सक्षम हे शब्दच माहीत नाहीत. कारण खेड्यातील 90 टक्के स्त्रिया अजुनही आर्थिकदृष्या सबळ नाहीत. त्यांना अजुनही चुल आणि मुल एवढेच माहित आहे. त्यातुलनेत शहरातील स्त्रियांना महितीची साधने आधिक उपलब्ध असल्यामुळे दररोज काहीना काही तरी नवीन शिकायला मिळते.
आजची स्त्री ही पुरूषांच्या खांद्याला खांदा लावुन चालणारी आहे. तिला स्वातंत्र्याचा अर्थ कळू लागला आहे. ती सक्षम होण्यासाठी तयार आहे.
पण समाजातील काही जुन्या विचारांच्या व्यक्तींमुळे स्त्रियांच्या विकासात आडचण निर्माण होत आहे. अशा व्यक्तींची विचार पद्धती बदलायला हवी. तेव्हा स्त्रिया सक्षम होण्यास पुर्णपणे मदत होईल. आज अनेक स्त्रिया सक्षम आहेत पण ज्या नाहीत त्यांचे काय? त्यांना दररोज त्रास सहन करावा लागतो. कौटूंबीक हिंसाचाराला बळी पडावे लागते. कधी सासू तर कधी दारूड्या पतीची मारहाण. त्या स्त्रियांकडे पाहून मन सुन्न होत. त्यांच्यासाठी काहीतरी करावसे वाटते. पण... सगळे या पण वरचं येऊन थांबते. स्त्रियांना अनेक क्षेत्रांमध्ये आरक्षण मिळाले आहे. मात्र, जर स्त्री ही एकटी बाहेर फिरु शकत नसेल तर काय करायचं या आरक्षणाचे. गेल्या वर्षी दिल्लीत घडलेली भयंकर घटना याचे उदाहरण आहे. स्त्रियांवर होणारा अत्याचार कोणाला दिसत नसेल का? सर्वांनाच तो नक्की दिसत असणार. पण तरीही यावर कोणीच का विचार करत नाही? स्त्रियांवर होणा-या अत्याचाराविरुद्ध लढत नाही. स्त्रियांवर होणा-या अत्याचाराविरोधात स्वतः स्त्रियांनाच लढावे लागणार आहे. आपला लढा आपल्यालाच जिंकावा लागणार आहे. त्यासाठी उठा, जाग्या व्हा आणि दाखवून द्या जगाला स्त्री शक्ती