आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वॉलमार्टने फ्लिपकार्टमधील 77 टक्के भागीदारी खरेदीचा व्यवहार पूर्ण केला

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - अमेरिकी रिटेल कंपनी वॉलमार्ट इंकने भारतातील सर्वात मोठी ई-कॉमर्स कंपनी फ्लिपकार्टमधील ७७ टक्के भागीदारी खरेदी करण्याचा व्यवहार पूर्ण केला आहे. त्याचबरोबर वॉलमार्टने फ्लिपकार्टमधील २०० कोटी डॉलरची (सुमारे १४,००० कोटी रुपये) नवीन इक्विटी (शेअर भांडवल) लावले आहे. यामुळे फ्लिपकार्टच्या व्यवसायाचा तेजीने विस्तार करणे शक्य होणार आहे. वॉलमार्टच्या वतीने शनिवारी जारी करण्यात आलेल्या एका प्रसिद्धिपत्रकात ही माहिती देण्यात आली आहे.


त्यानुसार भारतात या दोन्ही कंपन्या वेगवेगळ्या ब्रँड आणि व्यवसायाच्या प्रणालीनुसार कायम राहणार आहेत. फ्लिपकार्टचा आर्थिक अहवाल वॉलमार्टच्या आंतरराष्ट्रीय व्यवसायाचा एक भाग असेल. फ्लिपकार्टची उर्वरित २३ टक्के भागीदारी कंपनीचे सहसंस्थापक बिन्नी बन्सल, टेनसेंट, टायगर ग्लोबल आणि मायक्रोसॉफ्ट कॉर्पकडे आहे.

 

वॉलमार्ट इंटरनॅशनलचे अध्यक्ष तसेच सीईओ जुडिश मॅक्केना यांनी सांगितले की, "आमच्या गुंतवणुकीमुळे भारताला फायदा होईल. आम्ही ग्राहकांना गुणवत्ता असलेली वस्तू योग्य किमतीवर देणार आहोत, तर दुसरीकडे यासाठी कौशल्य असलेल्यांसाठी रोजगारात ही वाढ होणार आहे. पुरवठादारांनाही व्यापारासाठी नव्या संधी मिळतील. भारतातून शिकण्यासाठी, आमचे योगदान देण्यासाठी तसेच फ्लिपकार्टसोबत काम करण्यामुळे आम्ही अत्यंत आनंदी आहोत. भारत जगातील सर्वात तेजीने वाढणारा आणि आकर्षक बाजार आहे.' फ्लिपकार्टचे सहसंस्थापक आणि समूहाचे कार्यकारी अधिकारी बिन्नी बन्सल यांनी सांगितले की, "वॉलमार्टकडे रिटेल व्यापार करण्याचे विशेष कौशल्य आहे, पुरवठा चेनची माहिती आणि आर्थिक मजबुती आहे.'

 

भागीदारी खरेदीची या वर्षी केली होती घोषणा
विशेष म्हणजे वॉलमार्टने याच वर्षी मेमध्ये १,६०० कोटी डॉलर (सुमारे १.०७ लाख कोटी रुपये) मध्ये फ्लिपकार्टची ७७ टक्के भागीदारी खरेदी करण्याची घोषणा केली होती.

 

बातम्या आणखी आहेत...