आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्नायू, छाती आणि खांदे बळकट करेल, वॉल पुशअप

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

तुम्ही यापूर्वी कधी पुशअप केले नसतील तर पुशअपची सोपी सुरुवात वॉल पुशअपपासून करा. भिंतीच्या आधारे करण्यात येणारा हा व्यायाम स्नायू, छाती आणि खांदे बळकट करण्यासाठी फायद्याचा आहे. या पुशअपमध्ये पारंगत झाल्यानंतर तुम्ही याचे इतर प्रकारही सहजपणे करू शकता.

असे करा, वॉल पुशअप
हे करण्यासाठी भिंतीकडे तोंड करून उभे राहा. आपले हात भिंतींवर ठेवा. कोपर वाकवत छाती भिंतीच्या जवळ आणण्याचा प्रयत्न करा. त्यानंतर आधीच्या स्थितीत येऊन हीच क्रिया १२ ते १६ वेळा करा.

  • पुशअपचे प्रकारही फायद्याचे आहेत...

बेंच पुशअप
हे करण्यासाठी हात बेंचवर ठेवा. यादरम्यान तुमचे हात सरळ आणि शरीर एका रेषेत असले पाहिजेत. आता कोपर वाकवत छाती खालच्या दिशेने घेऊन या. त्यानंतर कोपर सरळ ठेवत सामान्य स्थितीत या.

फुल पुशअप
सर्वात आधी प्लँक करण्याच्या स्थितीत या. आता जोपर्यंत तुमची छाती जमिनीला टेकत नाही तोपर्यंत शरीर खालच्या दिशेने घेऊन जा. कोपर वाकवत शरीराजवळ आणा. या स्थितीत काही वेळ थांबा. नंतर सामान्य स्थितीत या.

- १२-१२ वॉल पुशअपचे ३ सेट करा. यामुळे तुम्हाला जास्त थकवा जाणवणार नाही.

या चुका टाळा
- वॉल पुशअप करण्याची योग्य पद्धतही अवश्य शिका. तुम्ही जर हे योग्य प्रकारे करत नसाल तर इजा होण्याची शक्यता असते.
- हे करताना आपली पाठ सरळ ठेवा. चुकीच्या पद्धतीने पाठ वरच्या दिशेने उचलल्यास तुमच्या कमरेत किंवा पाठीत वेदना होऊ शकतात.
- हा व्यायाम करताना श्वासाचा वेग सामान्य ठेवा. खूप वेगाने किंवा मंद गतीने श्वास घेऊ नका.
- हे करण्यासाठी पूर्णपणे खाली जाणे आणि पूर्णपणे वर उठणेदेखील गरजेचे आहे. जेणेकरून शरीराला पुरेसा फायदा मिळू शकेल.