आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

औरंगाबाद विधी विद्यापीठास ‘वाल्मी’ची 33 एकर जमीन

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - औरंगाबादेत स्थापन केलेल्या महाराष्ट्र राष्ट्रीय विधी विद्यापीठास कांचनवाडी येथील जल व भूमी व्यवस्थापन संस्थेची (वाल्मी) ३३ एकर जमीन विनामूल्य कब्जे हक्काने हस्तांतरित करण्याचा निर्णय मंगळवारी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला.


बंगळुरू येथील नॅशनल लॉ स्कूल ऑफ इंडिया युनिव्हर्सिटीच्या धर्तीवर राज्यात विधी विद्यापीठाची स्थापना करण्यात आली आहे. औरंगाबादेतील पदमपुरा येथील शासकीय अध्यापक महाविद्यालयात २०१७ पासून तात्पुरत्या स्वरूपात या विद्यापीठाचे काम सुरू करण्यात आले आहे. या विद्यापीठाच्या माध्यमातून देण्यात येणाऱ्या गुणवत्तापूर्ण विधी शिक्षणामुळे सामाजिक स्थैर्य, न्याय व विकासाला चालना मिळणार आहे.


आैरंगाबादेतील राष्ट्रीय विधी विद्यापीठासाठी यापूर्वी कांचनवाडी येथील गट क्र. १९ मधील १७ एकर जागा उपलब्ध करून देण्यात आली आहे. आता मंत्रिमंडळाच्या निर्णयानुसार या विद्यापीठास उच्च व तंत्रशिक्षण विभागांतर्गत कांचनवाडी येथील गट क्र. १७ व १८ मधील ३३ एकर जमीन दिली जाणार आहे. त्यामुळे या विद्यापीठाच्या स्थापनेसाठी आता एकूण ५० एकर जागा उपलब्ध झाली आहे.

बातम्या आणखी आहेत...