आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अक्रोडाच्या सेवनाने त्वचा राहील निरोगी, लिव्हर समस्या होतील दूर

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अक्रोडाचा सुक्यामेव्यामध्ये प्रामुख्याने समावेश आहे. हे शरीरासाठी अत्यंत फायदेशीर ठरते. अक्रोडमध्ये अनेक आरोग्यदायी गुणधर्म असून यामुळे शरीराची रोगप्रतिकारकशक्ती वाढते आणि मेंदूची शक्ती वाढण्यासाठीही याशिवाय स्मरणशक्तीही वाढवण्यास फायदेशीर ठरते. अक्रोडचा उपयोग चॉकलेट, कुकीज, लाडू, मिल्क शेक इत्यादी पदार्थांमध्ये केला जातो. अक्रोड खाल्ल्यामुळे तणावही दूर पळतो, असे संशोधनातून सिद्ध झाले आहे. काही दिवसांपूर्वी करण्यात आलेल्या या संशोधनातून अक्रोड खाल्याने पुरुषांच्या तणावामध्ये काही फरक पडतो का? यावर अभ्यास करण्यात आला. दररोज मूठभर अक्रोड खाण्यामुळे पुरुषांमध्ये बराचसा तणाव कमी होतो, असे एका अभ्यासातून स्पष्ट झाले आहे. हृदयविकार, मधुमेह आणि लठ्ठपणावरही अक्रोड लाभदायक आहे. 


अक्रोड खाल्याने शरीराला होणारे फायदे 
- अक्रोड लिव्हर संबंधित समस्या, थायरॉइड, सांधेदुखी तसेच पिंपल्स, डायबिटीस यांसारख्या समस्या दूर करण्यासाठी मदत करतंे. 
शरीरावर एखाद्या भागामध्ये आपल्याला वेदना, जळजळ होत असेल किंवा सूज आली असेल तर त्या ठिकाणी अक्रोडच्या सालाचा लेप लावा आराम मिळेल. 


- आहारात दररोज ५ अक्रोड आणि १५ ते २० मनुक्यांचा समावेश केला तर अनिद्रेची समस्या दूर होते. अक्रोडमध्ये मेलाटोनिन आढळून येतं जे झोपेसाठी परिणामकारक ठरतं. 
- अक्रोडमध्ये कॅन्सररोधी गुणधर्म असतात. त्यामध्ये अ‍ॅंटि-ऑक्सिडंट असतात, जे कॅन्सर वाढण्यापासून रोखतात. तसेच ब्रेस्ट कॅन्सर रोखण्यासाठीही अक्रोड लाभदायक ठरतं. 


- गरोदर महिलांसाठी अक्रोडचं सेवन करणं अत्यंत फायदेशीर ठरतं. पोटातील बाळाला पोषण पुरवण्यासाठी अक्रोड मदत करतं. 
- अक्रोडची पाने चावल्याने आपल्या दातात होणाऱ्या वेदना कमी होतात. 


- रोज अक्रोड खाल्ल्याने शरीरावर होणाऱ्या सफेद डागांची समस्या दूर होते. 
- अक्रोडमध्ये ओमेगा-३ फॅटी अ‍ॅसिड असतं. त्यामुळे याचं सेवन करणं हृदयाचे आरोग्य राखण्यासाठी मदत करतं. 


- अक्रोड हाडं मजबूत करण्यासाठी मदत करतं. त्याचबरोबर दातांचे आरोग्य राखण्यासाठीही मदत करतं. 
- अक्रोडमध्ये सर्वात जास्त व्हिटॅमिन-ई आणि प्रोटिन्स आढळून येतं. याच्या नियमित सेवनाने केस आणि त्वचेचे आरोग्य चांगलं राखण्यासाठी मदत होते. 


- अक्रोड रक्तातील कोलेस्टेरॉल लेव्हल कमी ठेवण्याचं काम करते. 

बातम्या आणखी आहेत...