आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Wanjari Community Marches In Beed For Increased Reservation, Agitations Will Take Place Across The State

वाढीव आरक्षणासाठी वंजारी समाजाचा बीडमध्ये मोर्चा, राज्यभर होणार आंदोलने

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बीड  - वंजारी समाजाला असलेल्या आरक्षणात ८ टक्क्यांची वाढ करून ते दहा टक्के करण्यात यावे, या मागणीसाठी  वंजारी समाज आक्रमक झाला आहे. आरक्षणासाठी बीडमध्ये बुधवारी राज्यातील पहिला मोर्चा निघाला. यानंतर आता माेर्चाचे हे लोण राज्यभरात पोहोचणार आहे. दरम्यान, सुमारे दहा हजार वंजारी समाजबांधव रस्त्यावर उतरल्याने बीड दणाणून गेले होते. विद्यार्थिनींच्या नेतृत्वात झालेल्या या मोर्चात भाषणेही विद्यार्थिनींचीच झाली. 

राज्यभरात ९५ लाखांपेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या वंजारी समाजाला सध्या २ टक्के आरक्षण आहे. शेती व ऊसतोडणी करणारा समाज म्हणून या समाजाची ओळख आजही आहे. दरम्यान, ही ओळख बदलून शिक्षित समाज म्हणून ओळख निर्माण करण्यासाठी समाजाला सध्या असलेले २ टक्के आरक्षण हे लोकसंख्येच्या मानाने खूप कमी आहे. पुरेशा आरक्षणाअभावी गुणवत्ता असूनही सामान्य आर्थिक परिस्थितीच्या कुटुंबातील विद्यार्थ्यांना शिक्षण घेताना, नोकरी मिळवताना अडचणींचा सामना करावा लागत आहे. यामुळे आता वंजारी समाजाचे आरक्षण २ टक्क्यांवरून वाढवून १० टक्के करण्याची मागणी हाेत आहे. यासाठी राज्यातील पहिला वंजारी आरक्षण मोर्चा बुधवारी बीडमध्ये निघाला. 

 डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून मोर्चाला सुरुवात झाली. डॉ. आंबेडकर पुतळा, माळीवेस, सुभाष रोड, अण्णाभाऊ साठे पुतळा, बसस्थानक, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा मार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर दुपारी दोन वाजेच्या सुमारास मोर्चा धडकला. जिल्हाधिकाऱ्यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले. शिस्तबद्ध पद्धतीने मोर्चेकऱ्यांनी मोर्चा काढून आपल्या मागण्या मांडल्या.
 

विद्यार्थिनींनी मांडल्या व्यथा 
जिल्हाधिकारी कार्यालयासमोर प्राची महारुद्र बांगर, प्रियंका शहादेव बडे, प्रणाली कैलास पाखरे, सुनीता बाबासाहेब बाेडखे, सुजाता मुंडे या विद्यार्थिनींची भाषणे झाली. त्यांनी आपल्या भाषणातून समाजाची व्यथा मांडली. संत भगवान बाबांनी शिक्षणाचा संदेश दिला म्हणून ऊसतोड समाज शिक्षणाकडे वळला आता नोकऱ्यांचा प्रश्न असून वाढीव आरक्षणाची गरज त्यांनी मांडली.
 

शिवाजी चौकामध्ये  ठिय्य
साठे चौकातून मोर्चा शिवाजी चौकात आल्यानंतर मोर्चेकऱ्यांनी काही वेळ ठिय्या मांडून आरक्षणाच्या घोषणा दिल्या. 

बातम्या आणखी आहेत...